*हिमायतनगर/प्रतिनिधी:
येथील हुतात्मा जयवंतराव पाटील महाविद्यालयाच्या रासेयो विभागाच्या वतीने शासनाच्या निर्देशानुसार अभिवादन पर कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांनी आपल्या मनोगतातून भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या जीवन कार्यावर व तसेच संगीतातील योगदानावर सविस्तर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील क्रिडा विभागाचे प्रमुख डॉ. दिलिप माने, प्रा. आशिष दिवडे, प्रा. राजू बोंबले, प्रा. अस्तिक रंगिनवार व कार्यालयीन अधीक्षक श्री संदीप हरसूलकर, श्री विश्राम देशपांडे आदींनी परिश्रम घेतले.
तसेच या कार्यक्रमाचे सुंदर असे आयोजन व सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. शिवाजी भदरगे यांनी केले. तर आभार सहकार्यक्रमाधिकारी डॉ. लक्ष्मण डोंगरे सर यांनी मानले. या कार्यक्रमाला महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (हा कार्यक्रम शासनाने घालून दिलेल्या कोविड-19 च्या सर्व नियमांचे पालन करून घेण्यात आला.)
194 Views