किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

” महिला मतदार प्रश्नमंजूषा ( स्वीप क्वीझ)” या मतदार जागृती उपक्रमाला किनवटच्या साठेनगर व रामनगरात  उत्स्फूर्त प्रतिसाद

किनवट : महिला मतदारांची मतदानाची  टक्केवारी वाढावी याकरिता स्वीप कक्षाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ” महिला मतदार प्रश्नमंजूषा ( स्वीप क्वीझ)” या अनोख्या उपक्रमाला शहरातील साठेनगर व रामनगर येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
     जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिजीत राऊत (भाप्रसे) , जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा स्वीप नोडल अधिकारी मीनल करणवाल (भाप्रसे) यांच्या मार्गदर्शनाखाली किनवटच्या सहायक जिल्हाधिकारी तथा  निवडणूक निर्णय अधिकारी कावली मेघना (भाप्रसे) यांच्या संकल्पनेतून 83-किनवट विधानसभा मतदारसंघात महिला मतदारांची प्रश्नमंजूषा (स्वीप क्वीझ) हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.
        गट शिक्षणाधिकारी तथा स्वीप कक्ष प्रमुख गंगाधर राठोड यांच्या नेतृत्वात स्वीपचे सर्व सदस्य ही प्रश्नमंजूषा घेत आहेत. स्वीप सदस्य तथा केंद्र प्रमुख उत्तम कानिंदे हे नव मतदार होण्यापासून ते मतदान प्रक्रिया पूर्ण होईपर्यंतची माहिती देतात. मग त्या माहितीवरच सोपा प्रश्न विचारला जातो. ज्यांनी उत्तरासाठी हात वर केला. त्यांना उत्तर देण्याची संधी दिली जाते . एका महिला मतदाराने सलग तीन प्रश्नांची उत्तरे दिल्यास त्यांना 83- किनवट स्वीप स्टीकर लावलेली वस्तू भेट देण्यात येते.
         लोकसभा निवडणुकीत 50% पेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रावर जाऊन तेथील महिला मतदारांना मतदानाचे महत्व पटवून दिल्या जाते. यानुषंगाने मतदान केंद्र क्र. 184 – साठेनगर किनवट येथे घेण्यात आलेल्या स्वीप क्वीझ स्पर्धेत रोहिणी रमेश मुनेश्वर व नव मतदार खुशी मधूकर अन्नेलवार ह्या विजेत्या ठरल्या. मतदान केंद्र क्र. 206 – नयाकॅम्प , किनवट येथील महिला मतदार जनजागृती प्रश्नमंजुषेत गीतास्वामी मल्यपुलवार, विजया महेश मेडलवार व  दिपा गणेश काशी यांनी बक्षिस पटकावले. यावेळी प्रा.डॉ. मारोती कसाब व बीएलओ लक्ष्मी दासरवार उपस्थित होते.
     ही स्वीप क्वीझ यशस्वीपणे घेण्यासाठी व गीत प्रबोधनातून मतदार जनजागृती करण्यासाठी स्वीपचे सर्व सदस्य उप प्राचार्य डॉ. पंजाब शेरे , शाहीर प्रो. डॉ. मार्तंड कुलकर्णी , प्रसिद्ध गायक सुरेश पाटील ,गीतकार रुपेश मुनेश्वर , रमेश मुनेश्वर , शेषराव पाटील , भूमय्या इंदूरवार , सारंग घुले , ढोलकी सम्राट सूरज पाटील , एम.बी. स्वामी , तंत्रस्नेही सचिन कोंडापलकुलवार , आकाश बोलेनवार , रंजना पोटे हे परिश्रम घेत आहेत.

35 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.