किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

किनवट येथे सीटी स्कॅन मशीन व आरटीपीसीआर तपासणी प्रयोगशाळा स्थापन करणार -खासदार हेमंत पाटील

उपजिल्हा रुग्णालयात ११ रुग्णवाहिके चे लोकार्पण

किनवट :(आनंद भालेराव)
किनवट येथील गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात सीटी स्कॅन मशीन व आरटीपीसीआर तपासणी प्रयोगशाळा स्थापन करण्यासाठी वरिष्ठ स्तरावरून पाठपुरावा करण्यात येईल असे खासदार हेमंत पाटील म्हणाले . येथील उपजिल्हा रुग्णालयात ११ रुग्णवाहिकेचे लोकार्पण खासदार हेमंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसंगी ते बोलत होते .
येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयात , राज्य आपत्ती निधीतून किनवट व माहूर तालुक्यातील 11 प्राथमिक आरोग्य केंद्रांना मिळालेल्या रुग्णवाहिकांच्या लोकार्पण सोहळ्यात खासदार हेमंत पाटील बोलत होते.

यावेळी किनवट विधानसभा मतदार संघाचे आ. भीमराव केराम, सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार , समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. उत्तम धुमाळे,तहसीलदार उत्तम कागणे,तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय मुरमुरे ,उपजिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड,माजी उपनगराध्यक्ष अनिल तिरमनवार, शिवसेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील मुरकुटे,भाजपा तालुकाध्यक्ष संदीप केंद्रे,आदी उपस्थिती होते.
पुढे बोलताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, आदिवासी समाजाच्या विकासासाठी येणारा शासनाचा निधी हा सन्मार्गी लागला पाहिजे, माणूस म्हणून जन्माला आल्याचं आपल्या सत्कृतीतून अधिकारी, कर्मचारी,आणि लोकप्रतिनिधी आपण सर्वांनी दाखवून दिले पाहिजे. मागील दहा वर्षापासून बंद असलेली आदिवासी बांधवांसाठी जीवनदायी ठरणारी खावटी अनुदान योजना सुरू केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांचे मी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर स्वस्त धान्य दुकानातील धान्य हे गरजू व उपाशी लोकांच्या पोटात गेले पाहिजे ते इतरत्र जाऊ नये याकरिता सहायक जिल्हाधिकारी तथा तहसीलदार यांनी कटाक्षाने या बाबीकडे लक्ष द्यावे असेही ते म्हणाले.यावेळी सहायक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार व आमदार भीमराव केराम यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला गटविकास अधिकारी सुभाष धनवे, डॉ. संदेश राठोड यांच्यासह माजी उपसभापती गजानन कोल्हे पाटील,जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड, कपील रेड्डी, गजानन बच्चेवार, प्रकाश कार्लेवाड आदी उपस्थित होते.नियोजन अधिकारी शंकर साबरे, उत्तम कानिंदे,प्रकाश सिरसाठ, अजमोदीन, लक्ष्मीकांत ओबरे आदिंनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.

562 Views
बातमी शेअर करा

One thought on “किनवट येथे सीटी स्कॅन मशीन व आरटीपीसीआर तपासणी प्रयोगशाळा स्थापन करणार -खासदार हेमंत पाटील

  • May 2, 2021 at 7:07 pm
    Permalink

    आपल्या प्रतिक्रिया येथे द्या.

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.