२८ जुलै रोजी शालेय पोषण आहार कामगारांचा जिल्हा परिषदेवर मोर्चा ( स्वयंपाकी व मदतनीस यांनी मोर्चात सामील व्हावे सीटूचे आवाहन )
नांदेड : सिटू संलग्न महाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार संघटनेच्या वतीने स्वयंपाकी व मदतनीस यांच्या विविध मागण्या घेऊन जिल्हा परिषद कार्यालय नांदेड येथे दिनांक २८ जुलै रोजी दुपारी १२:०० वाजता भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रेल्वे स्टेशन येथून दुपारी १२.०० वाजता मोर्चाची सुरुवात करण्यात येणार आहे. देशातील इतर राज्यांप्रमाणे शापोआ कामगारांना रुपये अकरा हजार दरमहा मानधन देण्यात यावे. कामगारांना विनाकारण व विना चौकशी कामावरून कमी करू नये. काही ठिकाणी मुख्याध्यापक व इतर शाळेशी संबंधित व्यक्ती शाळेचा परिसर व वर्ग खोल्या साफसफाई चे काम शापोआ कामगारांना लावत आहेत आणि असे बेकायदेशीर काम करण्यास विरोध केल्यास कामावरून कमी करण्याची धमकी देत आहेत तसे करणाऱ्या मुख्याध्यापक व संबंधिता विरोधात कामगारांचे शोषण व अवमान या कायद्यानुसार फौजदारी गुन्हे दाखल करावेत. मागील थकीत मानधन तात्काळ अदा करावे. सेंट्रल किचन पद्धत बंद करावी. सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक आदेशाप्रमाणे किमान वेतन २४ हजार रुपये दरमहा देण्यात यावे. कामगारांना शासकीय सेवेत कायम करून कर्मचारी म्हणून दर्जा द्यावा. सेवा समाप्तीच्या वेळी सेवापुर्ती म्हणून रुपये एक लाख कामगारांना सानुग्रह अनुदान देण्यात यावे व तीन हजार रुपये पेन्शन लागू करावे.निवृत्त झालेल्या कामगारांच्या जागी त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीस सेवेत रुजू करून घ्यावे. इंधन व भाजीपाला बिल कामगारांच्या बँक खात्यात प्रत्येक महिण्याच्या १० तारखेच्या आत जमा करावे.आदी मागण्यासह इतरही मागण्या करण्यात येणार आहेत.
सदरील मोर्चामध्ये जिल्हा परिषद चे आणि खाजगी शाळेतील स्वयंपाकी व मदतनीस यांनी मोठ्या संख्येने सामील व्हावे असे आवाहन संघटनेच्या वतीने कॉ.विजय गाभणे, कॉ.कालिदास सोनुले, कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.धोंडगीर गिरी, कॉ.अनिल कऱ्हाळे, कॉ.जनार्धन काळे,कॉ.साहेबराव दहिभाते, कॉ.मारुती दासके, अबू गुडमलवार,कॉ.दत्ता शिंदे शिवाजी डुबुकवाड, गोपाळ लष्करे, कॉ.दिलीप कोडापे, बालाजी गवलकर,साधनाबाई शिंदे,सुमनबाई गिरी, दत्ता शहाणे, इंदुबाई धोघेवाड,गुलाब खान,फारुख भाई मिस्त्री, दिगंबर काळे,माधव अंतापुरे, नागोराव कमलाकर,सदाशिव राऊत, राजू येडेकर,शमशोद्दीन शेख,गणपत शिरसागर, शांताबाई तारू,गीता देशपांडे, उमेश पिल्लेवार, विश्वनाथ ढोले सुदाम गुरनुले आदींनी केले आहे.