नीट 2021 परीक्षेत एमबीबीएस कोर्सला पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा
किनवट/प्रतिनिधी: आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत जनजातीय गौरव दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळा नीट 2021 परीक्षेत एमबीबीएस कोर्सला पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा आश्रम शाळा किनवट येथे नांदेड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विपिन इटनकर व किनवट आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकुमार पुजार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
या प्रसंगी आदिवासी समाजसेवकांचा ही सत्कार करण्यात आला.
तसेच उपविभागीय स्तरीय समिती कार्यालय किनवट यांच्या वतीने अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वन निवासी वन हक्क मान्यता अधिनियम 2006 व नियम 2008 व सुधारणा नियम 2012 अंतर्गत क्रांतीसुर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त एक दिवशीय कार्यशाळेचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी विपिन इटनकर यांनी मार्गदर्शन केले तसेच सर्व आश्रम शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षक वृंद यांचाही गौरव माननीय जिल्हाधिकारी यांच्या हस्ते करण्यात आला. शेवटी शाळेचे मुख्याध्यापक यांनी सर्वांचे आभार मानले.
याप्रसंगी विद्यार्थी, शिक्षक,पालक, मुख्याध्यापक ,इतर समाजसेवक समाज व बांधव उपस्थित होते.