भाजपा शहराध्यक्षाच्या घरासमोरील सांडपाण्याचा प्रश्न सुटणार का?
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.३०.जिल्यातील धर्माबाद शहरातील कै.गोविंद राव पानसरेयांच्या हुतात्मा स्मारक पासून ते शिव मंदिर पर्यंत अनेक वर्षापासून प्रलंबित असलेला रस्ता अनेक उपोषणे अनेक निवेदन देऊन माजी नगराध्यक्ष कै.विनायकराव कुलकर्णी यांच्या कार्यकाळात प्रभाग क्र.१.नगरसेविका सौ.नीता संजीवकुमार गायकवाड,नगरसेविका श्रीमती.अनुसयाताई राजफोडे, नगरसेवक श्री.शेख शादुल मोलाना यांच्या मागणीतून हा रस्ता झाला खरा पण नाली नसल्याकारणाने घरातील सांडपाणी हे सध्याचे भाजपा शहराध्यक्ष यांच्या निवासस्थाना पासून वाहत आहे.
त्यामुळे रस्त्याची दुरवस्था होत असून या मुख्य रस्त्यावरून महाविद्यालय,शाळा, देवस्थानाला विद्यार्थी व नागरिक जात असतात वाहने जात असताना शाळकरी विद्यार्थ्यांच्या अंगावर पाणी उडत आहे.
सततच्या पाण्याने रस्ता गुळगुळीत झाल्याने मोटार सायकल स्लीप होऊन अनेकांना छोट्या मोठ्या दुखापत झाल्या आहेत.
या सांडपाण्याच्या वादाने अनेकांचे भांडणे पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचले असता. नालीसाठी शिव मंदिर परिसरातील रहिवाशांनी अनेकदा नगरसेवक प्रतिनिधी सह निवेदन दिले तरीसुद्धा रहिवासीयांना सांडपाण्याचा प्रश्न काही सुटेना
येथील नागरिकांचे सध्याचे भाजपाचे शहराध्यक्ष व विकासाच्या रथावर चालणारे आमदार राजेश पवार यांच्याकडे या रोडवरील नालीचा प्रश्न व डेंगू सारख्या अशा अनेक बिमाऱ्या उदयास येत आहेत. यापासून बचावा करता.शिव मंदिर परिसरातील रहिवासी शिव मंदिर परिसरात रहिवासी असलेले भाजपा शहराध्यक्ष रमेश अण्णा गौड हे आमदार साहेबांचे खंदे समर्थक समजले जातात
या आशेने शहर अध्यक्षाच्या घरासमोरील सांडपाण्याकरता नालीचा प्रश्न मार्गी लागेल असे त्या परिसरातील नागरिक व्यक्त करीत आहेत.