लेंडीप्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे समस्या सोडवुन लेंडी प्रकल्प लवकर पुर्ण करण्याच्या मागणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्वपूर्ण बैठकीत खासदार चिखलीकर यांच्या सोबत मधु गिरगावकर बैठकीस उपस्थित
देगलूर_बिलोली: 38 वर्षापासून प्रलंबित असलेल्या लेंडी प्रकल्पा संदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत मुंबई मंत्रालयातील सह्याद्री अतीथी गृहात नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर साहेब यांच्या नेतृत्वात चर्चा करण्यात आली यावेळी नवीन कायद्याने जमीनी संपादीत करव्यात.नवीन कायद्याने आम्हाला मावेजा द्यावे. आमच्या जमीनी २०१३ च्या कायद्यानुसार संपादीत करावे प्रकल्पातील बुडीत क्षेत्रातील बेरोजगारांचा नवीन सर्वे करुन प्रत्येक बेराजगारास उद्योगास अनुदान द्यावे उदा. बुडीत क्षेत्रातील भूमिहीनास ४० आर जमीनीचे चालू भावाप्रमाणे मावेजा देणे,दरम्यान लेंडी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी लेंडी प्रकल्प ग्रस्त शेतकऱ्यांचे व गावकऱ्यांचे समस्या सोडवुन लेंडी प्रकल्प लवकर पुर्ण करण्याच्या मागणीसाठी शिष्टमंडळासह निवेदनही देण्यात आले यावेळी खा.प्रतापराव पाटील चिखलीकर, व्यंकटराव पाटील गोजेगावकर, मधु जी गिरगावकर गुणवंतराव पा.हंगरगेकर, सुरेश सावकार पंदीलवाड (चेअरमन मुक्रमाबाद), यांच्या सह अनेकांची उपस्थिती होती.