धामनदरी ग्रामपंचायत चे आदिवासी महिला सरपंच पद अबाधित;भाजपा v/s राष्ट्रवादी सामना रंगला
किनवट ता प्र दि 30 तालुक्यातील धामनदरी ग्राम पंचायत च्या राजकीय कुरघोडीच्या डावपेचामुळे विद्यमान आमदार भीमराव केराम विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दिनकर दहिफळे, समाधान जाधव , प्रकाश राठोड, प्रवीण म्याकलवार, अनिल पाटील कऱ्हाळे, राहुल नाईक व प्रेमसिंग जाधव सरपंच अंबाडी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या द्वितीय फळीने थेट लढत दिल्याने मौजे धामनदरी ह्या ग्रामपंचायत चे आदिवासी महिला सरपंच चे पद अबाधित राहिले आहे.
त्याचे झाले असे की धामनदरी येथे मागील सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीत आ.केराम समर्थक गट व मा आ नाईक समर्थक गट समोरसमोर निवडणूक लढवत होते त्यात आ केराम गटाला विजय प्राप्त झाला तर थेट जनतेतून आदिवासी महिला या संवर्गातील महिला जिजाबाई आत्राम ह्या निवडून आल्या इथं पर्यंत सर्व ठीक आहे तर माजी आ नाईक गटाने पराभव मान्य करत तेथील राजकारण पासून सुरक्षित अंतर ठेवले यामुळे आ केराम समर्थक गटाने गावाचा कारभार हाती घेतला परंतु हे सर्व होत असतांना कुठेतरी माशी शिंकली अन थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच श्रीमती आत्राम यांच्यावर येथील ग्रा पंचायत सदस्यांनी अविश्वास प्रस्ताव सादर केला म्हणजे स्वतःच्या गटातील थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंचावर अविश्वास दाखल केला यामुळे धामनदारी येथील राजकारणात परत एकदा माजी आ.नाईक गटाची इन्ट्री झाली अन ज्या विरोधी गटातील सरपंचवर अविश्वास ठराव दाखल करण्यात आला त्या सरपंच मा आ नाईक समर्थक गटात दाखल झाल्या त्यामुळे त्यांना आपोआप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संरक्षण प्राप्त झाले तरी दरम्यानच्या काळात तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन होऊन सरपंच वरील अविश्वास ठराव मंजूर झाला त्या पाय उतार झाल्या व तेथील कारभार उपसरपंच कऱ्हाळे यांच्याकडे सोपविण्यात आला.
आता इथून वर्चस्वाच्या लढाईला सुरवात झाली ज्या सरपंच बाई चे पद गेले त्याविरुद्ध राष्ट्रवादी समर्थक गोटाने तांत्रिक बाजू मांडत , थेट जनतेतून निवडून आलेल्या सरपंच व कोविड चे नियम तथा थेट जनतेतुन निवडून आलेल्या सरपंचला पायउतार कसे करावे याची माहिती संकलित करत जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे दाद मागितली त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी धामनदारी च्या सरपंचवरील अविश्वास ठराव रद्द केला त्यानंतर ती संचिका पंचायत समिती किनवट येथील गटविकास अधिकारी यांच्या दालनात आल्या नंतर विद्यमान आमदार व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अशी थेट वर्चस्व ची लढाई सुरू झाली अन यात बाजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटाने मारल्याने धामनदारी च्या राजकीय वातावरणात खळबळ माजली असून गड ही गेला अन सिंह ही गेला अशी अवस्था आ केराम समर्थक धामनदारी येथील पॅनल ची झाल्याने किनवट तालुक्यातील प्रसिद्ध घोटी फाट्यावर तुफान चर्चा ऐकायला मिळत होती. यामुळे आता भविष्यात दोन्ही मातब्बर राजकीय गटात वर्चस्वाचे राजकारण पाहायला मिळेल यात काही शंका नाही तर आगामी काळात जिल्हा परिषद निवडणूक, गोकुंदा , घोटी सारख्या मोठ्या ग्राम पंचायत निवडणूक यामुळे राजकीय वातावरण हे तापलेलेच राहणार आहे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गटातील माजी सभापती दिनकर दहिफळे, माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद समाधान जाधव, प्रकाश राठोड, अनिल पाटील, प्रवीण म्याकलवार, राहुल नाईक, प्रेमसिंग जाधव सरपंच अंबाडी व धामनदारी येथील कार्यकर्त्यांनी विद्यमान आमदार भीमराव केराम यांना कडवे आव्हान दिले आहे.