*नांदेड*:दि.9.जिल्यातील नायगाव येथील वास्तविक या काळात उपचारासाठी रुग्ण येतच नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस रुग्ण दाखवण्यात आले.
या प्रकरणी साहेबराव वाघमारे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाकडे तक्रार करुन आहार योजनेतील भ्रष्टाचाराबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले
नायगाव ग्रामीण रुग्णालयात रूग्णांना देण्यात येणाऱ्या पोषण आहारात रुग्णांचे पोषण होण्याऐवजी अधिकारी आणि कंत्राटदाराचेच पोषण होत असून. खोटे रुग्ण दाखवून संगणमताने लाखो रुपयाचा अपहार करण्यात आला असून.या प्रकरणी एजन्सीसह वैद्यकीय अधिक्षक अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकरणी साहेबराव वाघमारे यांनी तक्रार केली होती.
तालुकास्तरावरील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या रुग्नांची जेवनासाठी गैरसोय होवू नये यासाठी आरोग्य विभागाने पोषण आहार योजना सुरु केली आहे. त्यासाठी दरवर्षी एका एका ग्रामीण रुग्णालयात तब्बल ५० लाखापर्यंत खर्च करण्यात येत असतांनाही रुग्णांना आहार मिळत नाही. संबधीत कंत्राटदार व वैद्यकीय अधिक्षकांच्या संगणमताने खोटे व बनावट रुग्ण दाखवून लाखो रुपये हडप करण्याचा गोरखधंदा चालू आहे.
नायगाव ग्रामीण रुग्णालयातील अंतर रुग्नांना आहार देण्यासाठी नाशिक येथील यशोधरा महिला सह.औद्योगिक उत्पादन संस्थेला कंत्राट मिळाले.या कंत्राटदाराने बालरुग्ण,जळीत रुग्ण,कर्करुग्ण, गर्भवती माता/स्तनदा यांच्यासाठी अतिप्रथिने युक्त आहारात किमान २ अंडी, छान पाण्यांचा दैनंदीन आहारात समावेश करावा. प्रौढ रुग्णांसाठी किमान ३०० मिली दुध, गर्भवती माता व स्तनदा माता ५०० मिली दुध देण्यात यावे. सर्व प्रौढ रुग्णांना दैनदीन आहारात १ फळ मिळणे आवश्यक (गभवती स्तनदा मातांना २ फळ देण्यात यावे.
मधुमेह रुग्णांना मौसंबी देण्यात यावे, बालरुग्णांना १ फळ देण्यात यावे शेंगदाणा लाडु बनवितांना ४० ग्रॅम शेंगदाणा व ३० ग्रॅम गुळ वापरणे आवश्यक होते. शुध्दपाणी, रुग्णांच्या गरजेनुसार देण्याचा नियम होता. सुप बनविण्यासाठी उसळी, डाळी, कडधान्य, फळभाजी, तेल यांचा वापर करावा. ताक आहार देतांना किमान ८०० मिली ताक बनविण्यासाठी दही पुरविण्यात यावे असा मेन्यू होता.
आहारा मध्ये पाव ४ केळी समावेश असावा. बालरुग्णांसाठी आहारामध्ये संध्याकाळी तांदुळ, भाज्या, डाळ याची खिचडी देणे. पालेभज्या, कंदभाज्या, इतर भाज्या यांचा आहारात नियमित समावेश करावा. दुधाची अलर्जी असल्यास सोयामील्कचा पर्याय देण्यात आला होता. त्याचबरोबर कंञाटदाराने ‘बेड टू बेड’ रुग्णांना आहार देण्याबाबत नियम घालून देण्यात आले होते.
स्थानिक स्तरावर डॉक्टर व आहारतज्ञांच्या सल्यानुसार रुग्णाच्या आजारानुसार देण्यात यावा असे आदेश असताना या सर्व नियम अटींना हरताळ फासण्यात आला.रुग्णांना देण्यात येणारा आहार पोषक घटक व गुणवत्ता युक्त असणे आवश्यक आहे. पण संबधीत कंत्राटदाराने येथील वैद्यकीय अधिक्षकांशी संगणमत करुन रुग्णांना आहार दिलाच नाही. दुसरीकडे बनावट रुग्ण दाखवून लाखो रुपयाची बोगस बिले काढण्यात आल्याची बाब माहिती अधिकारात उघड झाली आहे.
अखिल भारतीय मराठा महासंग्राम संघटनेचे ता.अध्यक्ष भाऊसाहेब चव्हाण यांनी या बाबत माहिती अधिकारात माहिती मागीतली असता नायगावचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. एच.आर. गुंटूरकर यांनी सुरुवातील माहिती देण्यास टाळाटाळ केली पण नंतर अर्धवट माहिती दिली असली तरी या माहीतीतून संगणमताने लाखो रुपयांचा अपहार झाल्याचे दिसून येत आहे.
कोविडच्या काळात मोठ्या प्रमाणात रुग्ण असल्याचे नोंद घेण्यात आली आहे. एप्रिल ते डिसेंबर २०१९ या काळात ४ हजार ६३५ रुग्णांना आहार देण्यात आल्याचे दाखवून ६ लाख ७२ हजार रुपये देण्यात आले. तर जानेवारी ते सप्टेंबर २०२० या काळात १४ हजार रुग्णांना आहार देण्यात आला असून यासाठी १८ लाख ६१ हजार कंत्राटदाराला अदा करण्यात आले.
वास्तविक या काळात उपचारासाठी रुग्ण येतच नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात बोगस रुग्ण दाखवण्यात आले.
या प्रकरणी साहेबराव वाघमारे यांनी जिल्हा शल्य चिकित्सकाकडे तक्रार करुन आहार योजनेतील भ्रष्टाचाराबाबत गंभीर मुद्दे उपस्थित केले होते. या प्रकरणी झालेल्या चौकशीनंतर कंत्राटदार आणि वैद्यकीय अधिक्षकांनी संगणमताने लाखो रुपयाचा अपहार केल्याची बाब उघडकीस आली असल्याने गुंटूरकरांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.