प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड अध्यक्षतेखाली किनवट ता.कार्यकारणी ची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न
किनवट ता.प्रतिनिधी: प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड अध्यक्षतेखाली व मराठवाडा सरचिटणीस आनंद भालेराव यांच्या उपस्थितीत किनवट तालुका कार्यकारणी ची महत्त्वपुर्ण बैठक संपन्न झाली.
आज दिनांक 24 एप्रिल रोजी ठीक 2 वाजता “आज कि न्यूज” कार्यालयात आयोजित बैठकीत किनवट तालुका कार्यकारणीच्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या नेतृत्वात संघटना मजबूत करण्याच्या दृष्टिकोनातून चर्चा करण्यात आली.
पत्रकारांच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्याचा यशस्वीपणे प्रयत्न संपूर्ण महाराष्ट्रभर संघटनेच्या मार्फत होत असून आपल्या काही समस्या असतील तर त्या जिल्हा कार्यकारणी कडे किंवा संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे सर यांच्याकडे मांडाव्यात त्यावर ठोस निर्णय घेण्यात येईल असेही आश्वासन जिल्हाध्यक्ष मा.संजीव कुमार गायकवाड यांनी या बैठकीदरम्यान बोलताना दिले.
तसेच किनवट टीमच्या वतीने विविध विधायक कार्यक्रम राबवून समाजसेवा कार्यात अग्रेसर असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त करून पुढील कार्यास सर्वांना शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संजीव कुमार गायकवाड यांचा किनवट प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ च्या वतीने शाल,श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी तालुका अध्यक्ष आशिष शेळके तालुका सचिव नसिर तगाले, कार्याध्यक्ष सय्यद नदीम, तालुका उपाध्यक्ष राजेश पाटील, ता. उपाध्यक्ष शेख अतिफ, , सहसचिव प्रणय कोवे,ता.सहकोषाध्यक्ष मारोती देवकाते,तालुका कार्यकारिणी सदस्य रमेश परचाके, चंद्रकांत कागणे, प्रा.जोगदंड सर,उद्धवराव रामतीर्थकर सर आदी मान्यवर उपस्थित होते.