किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

जनतेतील कोणालाही धमकी आली तर पोलीसांना सांगा, आम्ही सदैव तत्पर आहोत-निसार तांबोळी ; बनावट धमकीचे दुसरे पत्र पोलीसांनी उघड पाडले

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.21.संजय बियाणी यांची हत्या झाल्यानंतर धमकीचे पत्र लिहुन धंदा करणाऱ्यांना उत आला आहे. असाच एक प्रकार पोलीसांनी उघडकीस आणला आणि त्यातील आरोपीला अटक केली आहे.याने दोन व्यवसायीकांना पत्र देवून जिवे मारण्याची भिती दाखवून खंडणी मागितलेली आहे अशी माहिती नांदेड पोलीस परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरिक्षक निसार तांबोळी यांनी सांगितली आहे.निसार तांबोळी यांनी जनतेला आवाहन केले आहे की,अशी पत्रे कोणाला आली किंवा बियाणी हत्येच्या संदर्भाने कोणाला काही माहिती असेल तर ती पोलीसांना द्यावी बियाणी हत्याकांडानंतर त्या तपासात विघ्न आणण्यासाठी असे अनेक प्रयत्न सुरू आहेत.

नागरीकांनी सुबुध्दीने विचार करून शंका असेल तर आम्हाला अर्थात पोलीस विभागाला सांगा आम्ही जनतेच्या सेवेसाठी तत्परच आहोत.
आज दि.22 एप्रिल रोजी पोलीसांनी बोलावलेल्या पत्रकार परिषदेत निसार तांबोळी बोलत होते.

याप्रसंगी अपर पोलीस अधिक्षक निलेश मोरे, बियाणी हत्याकांडाचा तपास करणाऱ्या एसआयटीचे प्रमुख विजय कबाडे हे उपस्थित होते.याप्रसंगी पुढे बोलतांना निसार तांबोळी म्हणाले की,काही जणांना धमक्या आल्याबद्दलच्या चर्चा होत आहेत.

कांही लोकांना लेखी आणि काही लोकांना फोनद्वारे धमक्या आल्याची माहिती पोलीसांना आहे.त्या प्रत्येक माणसाला पोलीस विभाग बोलून त्यांची भिती दुर करण्याचा प्रयत्न करीत आहे.बियाणी प्रकरणात पोलीस विभागातील पथके 24 तास काम करत आहेत.त्या तपासात अडथळा आणण्यासाठी विशेष सोडून वेगळ्या चर्चा आणि वेगळ्या प्रकारची टिका अयोग्य आहे.

या संदर्भाने बियाणी कुटूंबियांना सुध्दा एक पत्र आले होते.ते पत्र व्यक्तीगत स्वार्थातून दुसऱ्याला त्रास देण्यासाठी होते आणि तपासाची दिशा भरकटण्यासाठी प्रयत्न करणारे होते.त्याचा शोध पोलीसांनी लावला.त्यातील गुन्हेगाराविरुध्द विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे आणि त्या व्यक्तीला अटकपण झाली आहे.

तसेच पुढे भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे शाम कमलकिशोर गुप्ता (27) रा.भुखंड क्रमांक 77 भाग्यनगर यांना एक पत्र आले. तसेच बांधकाम व्यवसायीक कौस्तुभ फरांदे यांना सुध्दा खंडणी मागून रक्कम न दिल्यास जिवे मारण्याची धमकी आली. याबाबत पोलीसांनी गुप्ता आणि फरांदे यांची भेट घेवून त्यांना कौशल्याआधारे भिती दुर करण्यासाठी प्रयत्न केले.

या बाबत गुप्ता यांना धमकी देणारा व्यक्ती पुरूषोत्तम रामचंद्र मांगुळकर (37) मु.रा.हिमायतनगर जि.नांदेड ह.मु.भुखंड क्रमांक 44 भाग्यनगर कमानीच्या आत नांदेड यास पकडण्यात यश आले.ही कामगिरी करण्यामध्ये हिमायतनगरचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बालाजी महाजन, शिवाजीनगरचे रवि वाहुळे, पोलीस अंमलदार राजकुमार डोंगरे यांनी उत्कृष्ट आणि उल्लेखनिय कामगिरी करत पुरूषोत्तम मांगुळकरला पकडले आहे.

भाग्यनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी मांगुळकर विरुध्द गुन्हा क्रमांक 140/2022 भारतीय दंड संहितेच्या कलम 385 आणि 386 नुसार दाखल करण्यात आला असून भाग्यनगरचे पोलीस निरिक्षक सुधाकर आडे अधिक तपास करीत आहेत.

बियाणी यांची हत्या झाल्यानंतर धमकीचे पत्र पाठवून अनेकांना खंडणी मागण्याचे प्रकार घडले आहेत.पुढे घडतील ही.अशा वेळेस जनतेने असा कोणताही धमकीचा संदेश,पत्र आले तर त्या बाबत पोलीसांना माहिती द्यावी पोलीस कोणत्याही परिस्थिती,कोणत्याही वेळी जनतेच्या सेवेसाठी उपलब्ध आहेत.

आम्ही पोलीस विभागाच्यावतीने जनतेला ही ग्वाही देवू इच्छीतो की, कोणत्याही प्रसंगाला इतर प्रकारे चर्चा करण्याऐवजी पोलीसांसोबत ती गोष्ट,ती घटना, ती धमकी,ते पत्र चर्चेत आणा आणि आमच्याकडून तुमच्या सुरक्षेची आम्ही जबाबदारीच घेतलेली आणि त्यासाठी आम्ही कधीच उशीर लावणार नाही असे निसार तांबोळी म्हणाले आहेत.

113 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.