रामनगर येथील माळावर चालणाऱ्या जुगार अड्यावर धाड ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल ; मुदेमाल व जुगाराचे साहित्य जप्त पोलिस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या पथकाची कार्यवाही
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२९.जिल्यातील धर्माबाद शहरातील रामनगर येथील माळावर मोकळ्या जागेत काहींजन तिरट नावाच्या जुगारावर पैसे लाऊन जुगार खेळत असल्याची गुप्त माहिती पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांना मिळाली त्यानुसार त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी कार्यवाही साठी पथक पाठवले सदरील पथकाने धाड टाकली असता एकूण ६ जण तिरट नावाचा जुगार खेळत असल्याचे
निदर्शनास आले त्यानुसार धर्माबाद पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला एकूण १०२५० रुपये व जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले.
मध्यरात्री या माळावर मोकळ्या जागेत असलेल्या विद्युत पोलच्या शेजारी तिरट नावाचा जुगार खेळणे चालू असल्याची गुप्त माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अभिषेक
शिंदे यांनी सहायक पोलिस निरीक्षक रमेश जाधवर,पोलीस उपनिरीक्षक गोपाळ सूर्यवंशी,
जमादार कुमरे,माकुरवार,संतोष अनेराव,घोसले,सुपारे आदींचे पथक त्या ठिकाणी पाठवले असता सदरील पथकाने उपरोक्त जुगार अड्यावर धाड टाकून जुगाराचे साहित्य तसेच नगदी १०२५० रुपये जप्त केले असून ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या ठिकाणी जुगार खेलविणारा व त्यातून
केटी काढणारा मुख्य सूत्रधार फरार झाला आहे.
गुन्हा रजिस्टर नंबर ३१३/२०२३ प्रमाणे पोलीस ठाण्यात ६ जणांविरुद्ध कार्यवाही करण्यात आली आहे.
शहर व तालुक्यातील जुगार अड्डे बंद करण्यासाठी पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस प्रशासन सातत्याने कार्यवाही करीत असते चालू वर्षात आतापर्यंत जुगार संदर्भात २७ कार्यवाही करण्यात आले व संबंधितांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.