किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

नांदेड,परभणी व जालना येथील दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश*3 चोरांकडून साडे एकवीस लाख रुपयांच्या तब्बल 30 दुचाकी जप्त*नांदेड वजिराबाद गुन्हे शोध पथकाची धडाकेबाज कारवाई

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.19.जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून दुचाकी चोरी करणाऱ्या टोळीने धुमाकूळ घातला आहे.

तीन चोरट्यांचा समावेश असलेल्या या टोळीला वजिराबाद पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने गजाआड केले असून चोरीला गेलल्या 21 लाख 80 हजार किंमतीच्या 30 दुचाकी जप्त केल्या आहेत.न्यायालयाने या तिन्ही चोरट्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

*जिल्ह्यातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटना नागरिकांची डोकेदुखी झाली आहे.*

दररोज होणाऱ्या या चोऱ्यांचा छडा लावावा असे आदेश पोलीस उपमहानिरीक्षक निसार तांबोळी, पोलीस अधोक्षक प्रमोद शेवाळे, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे,निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी चंद्रसेन देशमुख यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यास दिले होते.

यावरून वजिराबाद ठाण्याचे पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी नांदेड शहरात चालु वर्षात ज्या टिकाणी दुचाकी चोरीचे गुन्हे घडले,तेथील सीसीटीव्ही फुटेज चेक करुन गुन्हेगाराचा शोध घ्यावा,अशी सुचना गुन्हे शोध पथकास दिली.

या अनुषंगाने वजिराबाद पथकाचे प्रमुख सपोनि संजय निलपत्रेवार, पोलीस अंमलदार दत्तराम जाधव, गजानन किडे,विजयकुमार नंदे, शरदचंद्र चावरे,संतोष वेलुरोड, व्यंकट गंगलवार,रमेश सुर्यवंशी, अंकुश पवार यांनी दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी तपास सुरू केला.यात सदर दुचाकी चोरटे हे परभणी येथील असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली.

या माहितीवरून परभणी येथील सहायक पोलीस अधीक्षक अभिनाश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि खदीर शेख व पोलीस कॉन्स्टेबल निलेश कांबळे यांच्या मदतीने गुन्हेगारांचा शोध घेतला.यात पोलिसांनी शेख अरबाज ऊर्फ कोबरा शेख चांद,(वय 24, रा. दर्गारोड, परभणी),आरेज खान उर्फ आमेर अयुब खान (वय 28, रा.देशमुख गल्ली,परभणी) व मोहम्मद मुक्तदीर उर्फ मुक्‍का मोहम्मद अथर (वय 31, शाहीमस्जिद,परभणी) यांना गजाआड केले. चौकशीत या तिन्ही चोरट्यांनी वेगवेगळ्या ठिकाणाहून 30 दुचाकी चोरी केल्याचे सांगितले. या दुचाकी ज्याची किंमती 21 लाख 80 हजार रुपये एवढी आहे.

या कारवाईत पोलिसांनी वजिराबाद ठाणे हद्दीतील 8, पोलीस ठाणे नांदेड ग्रामीण 1, पोलीस ठाणे शिवाजीनगर 3, पोलोस ठाणे भाग्यनगर 1, पोलीस ठाणे ईतवारा 2, पोलीस ठाणे गंगाखेड जि.परभणी 5, पोलीस ठाणे कदीम जालना येथील 2,पोलीस ठाणे परतूर जि.जालना येथील 1 व पोलीस ठाणे अंबेजोगाई शहर जि.बीड येथील 1 गुऱ्हा असे एकुण 22 दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले. यात आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली.सदर चोरटयांनी फक्त होंडा युनीकॉन, होंडा शाईन व पॅशन प्रो या दुचाकीचे लॉक चार ते पाच महिन्यांमध्ये खराब होत असल्याने आरोपीतांनी नमुद कंपनीच्या गाड्यांना टार्गेट करुन त्या बनावट चावीचा वापर करुन चोरी करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी केले आवाहन
नांदेड शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेल्या तब्बल 30 दुचाकींचा शोध लावण्यात वजिराबाद पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाला यश आले आहे.परभणी येथून तीन चोरट्यांना ताब्यात घेत वजिराबाद पोलिसांनी ऐन दिवाळीच्या तोंडावर मोठी कारवाई केली आहे.या कारवाईचे पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांच्यासह पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कौतुक केले आहे.

वाहनधारकांनी केवळ कंपनीच्याच लॉकवर विसंबून न राहता अन्य खाजगी लॉकचाही वापर करावा ज्यामुळे आपली वाहने सुरक्षित राहतील असे आवाहन पोलीस अधीक्षक प्रमोदकुमार शेवाळे यांनी केले आहे.

जप्त करण्यात आलेल्या 30 दुचाकी खालीलप्रमाणे
आहेत.पोलीसांनी जप्त केलेल्या 30 दुचाकीचे चेसीस नंबर आणि इंजिन नंबर देत आहोत.

नागरिकांनी आपल्या किंवा आपल्या नातेवाईकां पैकी कोणाच्या या गाड्या असतील तर त्याबाबत चेसीस नंबर व आणि इंजिन नंबरची खात्री करून वजिराबाद पोलीसांशी संपर्क साधावा,असे आवाहन पोलीस उपअधिक्षक चंद्रसेन देशमुख यांनी केले आहे.

124 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.