सारंग वाकोडीकर यांचा खासदार हेमंत पाटील यांच्यावतीने गौरव
किनवट : येथील सेट ट्राईबचे संचालक सारंग प्रदीप वाकोडीकर , यांचा “महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2022” तसेच ‘महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा’ दरम्यान मुंबई येथे पार पडलेल्या विजेता सन्मान सोहळ्यात मा. राज्यपाल यांचे हस्ते सन्मानित झाल्याबद्दल खासदार हेमंत पाटील यांनी त्यांचा गौरव केला आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य , रोजगार , उद्योजकता व नावीन्यता विभागातर्फे महाराष्ट्र इनोव्हेशन सोसायटीच्या माध्यमातून आयोजित “महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह 2022” तसेच ‘महाराष्ट्र स्टार्टअप यात्रा’ राजभवन, मलबार हिल, मुंबई येथे दि.१६.१०.२०२२ रोजी सकाळी ११.०० वाजता पार पडलेल्या विजेता सन्मान सोहळ्यात त मा. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, सुप्रसिद्ध वैज्ञानिक रघुनाथ माशेलकर, प्रधान सचिव मनीषा वर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत आपणास सन्मानीत करण्यात आले होते.
हिंगोली लोकसभा मतदार संघातील किनवट या आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या सारंग वाकोडीकर या धडपडणाऱ्या युवकांचा सन्मान झाल्याबद्दल खासदार हेमंत पाटील व गोदावरी समूहाच्या अध्यक्षा राजश्रीताई हेमंत पाटील यांनी आपल्या विधानसभा संपर्क कार्यालयात बोलावून जनसंपर्क अधिकारी सुनिल गरड यांचे हस्ते अभिनंदन पत्र देऊन गौरव केला व भ्रमणधनीद्वारे संवाद साधून कौतुक केले.