चष्मा घालवण्यासाठी आता ‘काँटुरा व्हीजन’मिळते चांगली दृष्टी, डॉ. कांकरिया यांची माहिती
*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*
*नांदेड*:दि.२.’बदलत्या जीवनशैलीमुळे अतिशय लहानपणी दृष्टिदोष व मोठे चष्म्याचे नंबर लागण्याचे प्रमाण वाढत आहेत.कायमस्वरूपी चष्मा घालवण्यासाठी आता ‘काँटुरा व्हीजन’ तंत्रज्ञान विकसित झाले.
यामुळे चष्म्यापेक्षाही चांगली दृष्टी येते’असे मत अहमदनगर येथील नेत्रतज्ज्ञ डॉ.प्रकाश आणि सुधा कांकरिया यांनी व्यक्त केले.
नांदेड येथे नेत्रतपासणी शिबिरासाठी आले असता त्यांनी शनिवारी (ता. दोन) पत्रकारांसोबत संवाद साधला.
ते म्हणाले,”काँटुरा व्हीजन तंत्रज्ञानाद्वारे कोणत्याही प्रकारच्या गुंतागुंतीच्या दृष्टी समस्येवर व चष्म्याचा नंबर घालवता येतो. विशेष म्हणजे लहान मुलांच्या दृष्टी समस्येवरही आता उपचार करणे शक्य होणार आहे.
यासाठी ६० ते ८० हजार रुपये खर्च येत असून, शिबिरामध्ये ५० टक्के सवलतीमध्ये ही शस्त्रक्रिया केली जाते.अहमदनगरच्या साई सूर्य नेत्रसेवा लेसर प्रणालीवर आधारित सर्वात आधुनिक ‘काँटुरा व्हीजन’ तंत्रज्ञान उपलब्ध आहे.