माजी आ. प्रदीप नाईक यांचा मुस्लिम तेली समाजातर्फे समाजातील ज्येष्ठ मंडळी व युवकाकडुन यथोचित सत्कार व भविष्यातील रणनितीवर चर्चा
किनवट प्रतिनिधी
माजी आमदार प्रदिप नाईक व किनवट शहरातील मुस्लिम तेली समाजाची दिनांक 29 डिसेंबर शुक्रवार रोजी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.या बैठकीत मुस्लिम तेली समाज व मा.आ.प्रदीप नाईक यांच्यामध्ये महत्वाच्या विषयावर चर्चा झाली तर भविष्यातील रणनिती आखण्यात आली.यावेळी आयोजित कार्यक्रमात मा.आ. प्रदीप नाईक यांचा मुस्लिम तेली समाजातर्फे समाजातील ज्येष्ठ मंडळी व युवकाकडुन यथोचित सत्कार करण्यात आला.
किनवट शहरात मुस्लिम तेली समाजातर्फे समाजाच्या विविध समस्या,अडीअडचणी आणि राजकारणात समाजाची दिशा ठरविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत शहरातील सर्व मुस्लिम तेली समाजाचे युवक व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते तर या बैठकीला प्रमुख उपस्थिती म्हणून किनवट/ माहूर तालुक्याचे माजी आमदार प्रदीप नाईक यांना बोलविण्यात आले.सुरुवातीला मुस्लिम तेली समाजाच्या वतीने माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.या बैठकीत तेली समाजाने आपल्या समाजाच्या अडीअडचणी व्यक्त केल्या आणि मागील काही वर्षात विविध राजकीय पक्ष व नेत्यांनी या समाजाला डावलयामुळे नाराजी ही व्यक्त केली व येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत समाजाला न्याय देऊन सोबत घेऊन चालणारऱ्यांनाच समाज एकजुटीने मदत करेल अशी भावना व्यक्त केली.
माजी आमदार प्रदीप नाईक यांनी तेली समाजाची सर्व अडीअडचणी जाणून घेतल्या व या बैठकीत प्रमुख उपस्थिती म्हणून बोलावल्या बद्दल तेली समाजाचे आभारही मानले.पुढे बोलतांना नाईक यांनी सांगितले कि, समाजाची एकजूटता महत्त्वाची असते आणि मुस्लिम तेली समाज आपल्या एकजुटीसाठी प्रसिद्ध आहे.अन्य समाजाबरोबर तेली समाजानेही मला प्रत्येक वेळी खूप मदत केली आहे,हे तुमचे प्रेमच आहे कि,तुम्ही मला येथे बोलावून सत्कार केला.मी आपले हे प्रेम कधी ही विसरू शकत नाही आणि माझ्याकडून तेली समाजासाठी जे काही शक्य होईल ते मी करेल.मी सर्व जाती-धर्माला सोबत घेऊन काम करतो,प्रत्येक समाज माझ्यासाठी समान आहे,मी भेदभाव करत नाही,तेली समाजाने माझ्यावर विश्वास दाखवून जे अपेक्षा केली त्यावर मी खरं उतरविण्यचा प्रयत्न करेल असे म्हणत नाईक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
यावेळी मा.आ.प्रदीप नाईक यांच्या सोबत राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड,बाजार समितीचे सभापती गजानन मुंडे,माजी सभापती अनिल पाटील,उपसभापती राहुल नाईक,राष्ट्रवादी युवकचे तालुकाध्यक्ष बालाजी बामणे,कार्याध्यक्ष नईम खान,जिल्हाउपाध्यक्ष इरफान मेमन तर तेली समाजाचे हाजी सत्तार गौड,हाजी सईद चव्हाण,हाजी उस्मान भाटी,बाजार समितीचे संचालक सत्तार खी,रशीद गौड,शमशेर खीच्ची,जबिर चव्हाण,दाऊद चव्हाण,नसीर तंवर,नसीर तगाले,नूर तगाले,शब्बीर गौड,नूर गौड,शाहीद गौड,हनिफ तगाले,जुनेद तंवर,यासीन मलनस,अय्युब मलनस,तोहीद मलनस,सलीम बडगुजर,मोहसीन चव्हाण,अमीन चव्हाण,सद्दाम चव्हाण,इम्रान बैलीम, अय्युब बोरा,एजाज बोरा,मोबीन बोरा,सिराज बोरा,करीम गौड,फिरोज पठाण,सुबहान चव्हाण,एहतेशाम चव्हाण,इरफान बडगुजर,मोबिन तगाले,फिरोज चव्हाण,जलील चव्हाण,याकूब चव्हाण,उमर चव्हाण,आयान चव्हाण,अमीर चव्हाण,साकीब चव्हाण,हसन खीच्ची,सलमान मलनस,ओसामा बडगुजर,झिकर पोपटराज,साजिद गौड,रफिक खीच्ची,करीम चव्हाण,सलीम चव्हाण,कलीम चव्हाण,आदिल चव्हाण,अक्रम तगाले,बिलाल तगाले,इम्रान तगाले,अब्बू तगाले,जाहुल तगाले,तालिब मलनस,इरफान गौड,गुल्लू चव्हाण,वाजीद चव्हाण,मतीन तगाले,वसीम चव्हाण,लतीफ भाटी,मुन्ना तगाले,लतीफ तगाले,नोमान बडगुजर,शेख सफदर,नविद मलनस,नसीर चव्हाण,शब्बीर तगाले,आसिफ तगाले,मुसेब भाटी,दानिश बोरा,खाजा खान,रियाझ भाई,सलमान चव्हाण व तेली समाजाचे इतर लोक उपस्थित होते.