मातंग समाज अन्याय निवारण समिती (म.रा.)चे नाशिक येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात सम्पन्न.
नासिक/प्रतिनिधी: दि.01ऑक्टोंबर/2022 रोजी मातंग समाज अन्याय निवारण समिती महाराष्ट्र राज्याच्या वतीने नाशिक येथे एक दिवशीय प्रशिक्षण कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली
सदरील कार्यक्रमाची सुरुवात सकाळी 11 वाजता महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करून झाली त्यानंतर कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे आयोजन समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले
तद्नंतर मुख्य मार्गदर्शनाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. पहिल्या सत्रात
मा.भास्कर नेटके यांनी मातंग समाजाचा प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासावर सखोल मार्गदर्शन केले.
सदर मार्गदर्शनामुळे उपस्थिताना मातंग जातीबद्दल चा दर्जा माहिती झाला व त्यामुळे जातीचा दैदिप्यामान इतिहास एकूण मातंग असल्याचा अभिमान निर्माण झाला.
अड. मा.विलास साबळे यांनी चळवळीमध्ये काम करणाऱ्या तरुणांना कायद्याचे ज्ञान असणे कसे आवश्यक आहे हे पटवून दिले. कायदेविषयक सविस्तर माहिती उपस्थिताना दिली.सोबतच समितीने आतापर्यंत हाताळलेल्या सर्व प्रकारणांची माहिती उपस्थिताना दिली.त्यांच्या मार्गदर्शना मुळे अन्याय्य ग्रस्त व्यक्तींना कायद्याची मदत घेऊन कसे लढायचे हे तरुणांना समजले आणि या माहितीमुळे समाज बांधवांमध्ये एक निर्भीडता व आत्मविश्वास निर्माण झाला.
दुसऱ्या सत्राच्या सुरुवातीस
मा.डॉ.अंकुश गोतावळे.यांनी मातंग समाज अन्याय निवारण समितीची ध्येय धोरणे,उद्दिस्टे,नियम, समितीची रचना या बद्दल माहिती दिली. सोबतच मातंग समाजाच्या अधोगतीची कारणे, सामाजिक,आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात प्रगतीसाठी काय उपाययोजना आहेत याची माहिती दिली.सोबतच स्वाभिमानी चळवळ उभी करण्यासाठी समाजाच्या पैशावरच चळवळ उभी केली पाहिजे याची जाणीव करून दिली.त्यांच्या या मार्गदर्शनामुळे उपस्थितांमध्ये संघटन, समाजकार्य, स्वविकास, सामाजिक परिवर्तनाचा लढा कशा पद्धतीने लढायचा याची इत्यांभूत माहिती मिळाली
तर मा.आत्माराम गायकवाड यांनी मातंग समाजाला परिवर्तणासाठी शिक्षणाचे महत्व व मातंग समाजात व्यवसाय,उद्योगावर भर देण्याची का आवश्यकता आहे या बद्दल त्यांनी अधिक माहिती दिली.
त्यानंतर अध्यक्षीय भाषण..मा.सौ.जोशीला ताई लोमटे यांनी केले .आजपर्यंत समाजातील गटातटामुळे कसे नुकसान झाले आहे. भविष्यात एकत्र येणे का गरजेचे आहे हे समजावून सांगितले तसेच समाजातील सर्वच ज्वलंत प्रश्नावर धावता आढावा घेतला,
त्यामुळे तरुणांमध्ये कर्तव्याची जाणीव निर्माण झाली आणि भविष्यातील लढाईची दिशा समजली.
त्यानंतर प्रश्नोतरे घेण्यात आली.उपस्थितांच्या प्रश्नांना मार्गदर्शकांनी समाधानकारक उत्तरे देऊन त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित केला गेला.
सर्वांच्या मार्गदर्शनामुळे तरुण अतिशय आनंदी झाली होती,भारावून गेली होती सर्व वक्त्यांनी त्यांना धाडस दिले आणि चळवळीसाठी आवश्यक शिदोरी दिल्याचे त्यांनी व्यक्त केले.आज पर्यंत कधीही न बोलणारे तरुण कॅडर कॅम्प नंतर अतिशय खंबीर पने समाजाच्या प्रश्नावर बोलत होते अनेकांनी खूपमहत्वाचे प्रश्न विचारले आणि मान्यवरांनी त्यांच्या प्रश्नाचे मार्मिक उत्तरे देऊन समाधान केले.*
त्यानंतर..दिपक खोतकर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले..आणि 7:30 वाजता कार्यशाळेची सांगता करण्यात आली.
सदरील कार्यशाळेचे आयोजन श्री विलास शेळके(कार्याध्यक्ष -मा स अ नि स )
यांनी केले होते.सदर कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी मातंग समाज अन्याय निवरण समितीच्या वतीने त्यांचे विशेष अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले..
या कार्यक्रमास मा. जोशीला ताई लोमटे.
(अध्यक्ष-मा स अ नि स )मा. ॲड. विलास साबळे.( प्रवक्ते-मा स अ नि स )डॉ अंकुश गोतावळे(राज्यसमन्वयक -चंद्रपूर )मा भास्कर नेटके.( राज्यसमन्वयक- पुणे)
मा आत्माराम गायकवाड.( राज्यसमन्वयक -हिंगोली)आदी उपस्थित होते.