डोंगरगाव (ची) येथे विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न
किनवट प्रतिनिधी:डोंगरगाव ची येथे दिनांक 30 डिसेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रा संपन्न झाली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या 15 नोव्हेंबर पासून देशाच्या अनेक भागात विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली.आहे या यात्रेचा समारोप 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी होणार आहे .केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजनेची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत व्हावी या हेतूने ही यात्रा काढण्यात आली आहे .यामध्ये प्रामुख्याने उज्वला योजना, आयुष्यमान भारत योजना, प्रधानमंत्री विमा योजना यासह अनेक योजनेची माहिती गावातील लाभार्थ्यांना यावेळी देण्यात आली.या यात्रेमध्ये सरपंच बामनाजी मेटकर.तंटामुक्ती अध्यक्ष सुरेश पाटील सोळंके, उपसरपंच अजित साबळे ,प्राथमिक आरोग्य केंद्र जलदरा येथील आरोग्य अधिकारी डॉ खूपसे, ग्रामसेवक व्ही एस लोखंडे, केंद्रप्रमुख पी एम कौटीकवार, ग्रामपंचायत सदस्य शिवदास धुमाळे ,माधव खरोडे, गणेश ढाले, कुणाल भुरके , भागोजी वावधने ,प्रकाश मेंढे आरोग्य विभाग जलदरा येथील जी आर खरोडे ,पी आर मृघनकर, एस एल चव्हाण ,बी एम राठोड, वाय डी चाबुकस्वार, जे के तेलंगे ,श्रीमती जेडब्ल्यू शेळके, श्रीमती कोंडाबाई धुमाळे, इंदिरा मेंढे ,चंद्रकला भडंगे रमाकांत वागतकर, दत्ता मेंढे कृष्णा धुमाळे ,मुख्याध्यापक पी एन खरोडे ,एस डी स्वामी डी एन कोवे यांच्यासहऑपरेटर मनोज वानोले रोजगार सेवक लक्ष्मण वावधणे, मुर्तूज पठाण, गोविंद गायकवाड, गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.