विचार मंथनासाठी आदिवासी काँग्रेसची सभा संपन्न
किनवट : विचार मंथनासाठी प्रदेश आदिवासी काँग्रेसची सभा टिळकभवन मुंबई येथील कार्यालयात प्रदेश अध्यक्ष आ. नानासाहेब पटोले यांच्या अध्यक्षतेखाली आदिवासी सेलचे अध्यक्ष आनंदराव गेडाम यांनी नुकतीच आयोजित केली होती.
के. राजू समन्वयक एस.सी, एस.टी, ओ.बी.सी., अल्पसंख्यांक सेल नवि दिल्ली हे सभेला मार्गदर्शन करतांना म्हणाले की, राष्ट्रीय माजी अध्यक्ष मा. खा. राहुल गांधी यांनी आदिवासींचे प्रश्न जाणून घेण्यासाठी मला आज बैठकीसाठी पाठविले आहे. आदिवासी समाज कॉंग्रेसची वोट बँक होती. परंतु आज आदिवासी समाज काँग्रेसपासून दुर का जात आहे ? पक्षात व सरकारकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे काय ? विकासाच्या योजनापासून त्यांना वंचित ठेवले जात आहे काय ? हे जाणून घेऊन मी राहूल गांधींना रिपोर्ट सादर करणार आहे. यावर चर्चेमध्ये नेत्यांनी असे मत मांडले की, पक्षामध्ये आदिवासी समाजातील कार्यकर्त्यांना सतरंज्या उचलण्याचे काम करवून घेतल्या जाते. त्यांना पक्षात तालुका अध्यक्ष, जिल्हा अध्यक्ष किंवा प्रदेश अध्यक्ष पदी या स्वातंत्रयाच्या 70 वर्षात नियुक्त्या दिल्या गेल्या नाहीत.
शासनामध्ये आदिवासींना तालुका समन्वय समिती, जिल्हा नियोजन समितीवर नेमले नाही. शासनाच्या विविध कमिट्या किंवा बोर्डाचे अध्यक्षपद दिल्या जात नाही. 70 वर्षात त्यांना विधानपरीषद किंवा राज्यसभेवर घेतल्या गेले नाही. आदिवासींच्या 7% फंडामधून पैसे इतरत्र वळविण्यात येते व उरलेले पैसे ही खर्च केल्या जात नाहीत तो पैसा लॅप्स होतो. त्यामुळे आदिवासींचा विकास व्हावा तसा होत नाही . नकली आदिवासींची घुसखोरी शाासनाला रोखता आली नाही. आदिवासींच्या हक्काच्या जागेवर दिड लाख बोगस आदिवासी नौकऱ्यावर लागले आहेत. सुप्रिम कोर्टाने निर्णय दिल्यानंतरही त्याची शासनाकडून अंमलबजावणी केल्या जात नाही. 2001 चा अनु. जाती, जमातीच्या प्रमाणपत्राचा कायदा झाला परंतू आजपर्यत त्याची अंमलबजावणी शासनातर्फे करण्यात आली नाही. या सर्व बाबींमुळे आदिवासींमध्ये नैराश्य पसरले आहे. त्यामुळे काही प्रमाणात आदिवासी काँग्रेस पाासून दूर गेलेत हे खरे आहे. परंतू आदिवासी युवकांना सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात पक्षाने व राज्यशासनाने नविन योजना तयार करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांच्या न्याय हक्काच्या जागी नौकर भरत्या केल्या व आदिवासी जमीनींचे पटटे करून दिले, हस्तांतर जमिनी त्यांना मिळवून दिल्यास तसेच सिंचनाची व्यवस्था करून दिल्यास आदिवासी विकास महामंडळ व शबरी आर्थिक विकास महामंडळाला भरपूर पैसा देवून आदिवासींच्या योजनांचे नियोजन करून सुशिक्षित बेकारांना कमीत कमी रू. 2 लाखाच्या वर योजनांचा लाभ मिळवून दिल्यास आदिवासी बांधवांचे संसार उभे केल्यास व आदिवासी समाजाला पक्षात सन्मान देवून चांगली वागणूक देवून त्यांना तालुका, जिल्हा व राज्यपातळीवर महत्वाची पदे देवून शासनाच्या कल्याणकारी योजना खेडोपाडी आदिवासी पाडे, गुड्यापर्यंत पोहचवून कॉग्रेस पक्षाचा सेवेचा त्यागाचा, बलीदानाचा इतिहास सांगून दिवंगत प्रधानमंत्री इंदिरा गांधी व राजीव गांधी यांचा देशाच्या एकता आणि अखंडतेसाठी माय लेकाचे बलिदान गाव पातळीवर शेवटच्या माणसापर्यंत हा इतिहास सांगितला तर आदिवासी व इतर सर्व समाजातील काँग्रेसप्रेमी व तळागाळातील माणसे काँग्रेस मध्ये फार मोठया संख्येने जुळतील व 2024 मध्ये कॉग्रेसचे सरकार निवडून आणून पक्षाला गतवैभव प्राप्त करतील असे बहुतांश वक्त्यांनी मत व्यक्त केले. या सभेमध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे, माजी मंत्री प्रा.वसंतराव पुरके, माजी मंत्री पदमाकर वळवी, आदिवासीं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आनंदराव गेडाम, उपाध्यक्ष नारायणराव सिडाम यांनी याप्रसंगी आपले विचार मांडले.
या सभेला आदिवासीचे कॉग्रेसचे सरचिटणीस सुरेश तोडासे (प्रशासन), मनवेल वळवी सरचिटणीस, सचिन पालकर सरचिटणीस, मधुकर चौधरी सरचिटणीस, बळवंत गावीत जिल्हाध्यक्ष पालघर, प्रकाश सातपुते अध्यक्ष ठाणे, सुनिल कुमरे अध्यक्ष मुंबई, हनुमान माळी जिल्हाध्यक्ष बीड, श्रीमती ज्योती चोडीया, श्रीमती तृत्पी वाघमारे समन्वयक, श्री महेंद्र शिंदे उपाध्यक्ष वर्धा व इतर बरेचशे पदाधिकारी व कार्यकर्ते या सभेला उपस्थित होते.