किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

सरपंच निवडीसाठी टाळाटाळ : महिला ग्रामपंचायत सदस्याचा उपोषणाचा इशारा

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.9.जिल्यातील नायगाव तालुक्यात मेळगाव ग्रामपंचायतची निवडणूक होवून दोन महिने होत आली असता नाही सरपंच पदी निवड करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असून यापुढेही विविध कारणे दर्शवून पुनश्च जातीय द्वेषातून सरपंच पदापासून वंचित ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

त्यामुळे सदरची प्रक्रिया हि (ता. ११) फेब्रुवारी २०२२ रोजीच पूर्वनियोजित पत्रानुसार सरपंच पदासाठीच घेण्यात यावी

नायगाव तालुक्या मधील ग्रामपंचायत कार्यालय मेळगाव येथील अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या सरपंच पदाच्या निवड प्रक्रियेला जातीयद्वेषातून जाणीवपूर्वक विलंब करून जातीय द्वेषातून पदापासून वंचित ठेवल्या प्रकरणी अनुसुचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार कार्यवाही करण्यात यावी अन्यथा (ता.११) फेब्रुवारी पासून तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य भारतबाई अशोक महिपाळे यांनी यांनी दिला आहे.

मेळ्गाव येथील तत्कालीन अनुसुचित जाती प्रवर्गातील सरपंच अमोल महीपाळे यांना जिल्हाधिकारी नांदेड यांनी सरपंच व सदस्य पदावरून पुढील काळात राहण्यासाठी अपात्र
ठरविल्यानंतर संबंधिताच्या तसेच अनुसुचित जाती प्रवर्गातील अन्य एका महिला सदस्यालाही पुढील काळात सदर पदावर राहण्यास अनर्ह ठरविल्यामुळे या दोन्हीही रिक्त पदासाठी वरिष्ठाच्या आदेशावरून (ता.२१) डिसेंबर २०२१ रोजी निवडणुका घेण्यात आल्या तर (ता. २२ ) डिसेंबर रोजी मतमोजणी झाली. मतमोजणी नंतर सरपंचाची निवड होणे गरजेचे असतांना निवडणुकीला दोन महिने होत आले तरी निवडीची प्रक्रिया राबविण्यात टाळाटाळ करण्यात येत आहे.

अध्यासी अधिकाऱ्यांनी (ता.३) तहसीलदार नायगाव यांचे आदेशानुसार (ता.११) फेब्रुवारी रोजी सरपंच निवड करण्याचे पत्र काढले होते. पण कुणालाही सुचना न देता अचानक ते पत्र रद्द करुन ( ता.१६ ) फेब्रुवारी रोजी निवड करण्यात येणार असल्याचे समजले आहे.मेळगावचे सरपंच पद हे अनुसूचित जातीसाठी राखीव असल्याने जातीय द्वेष भावनेतून निवड करण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप महिला ग्रामपंचायत सदस्य भारतबाई अशोक महिपाळे यांनी केला आहे.
निवडणूक होवून दोन महिने होत आली असतात सरपंच निवड करण्यासाठी टाळाटाळ करण्यात येत असून यापुढेही विविध कारणे दर्शवून पुनश्च जातीय द्वेषातून सरपंच पदापासून वंचित ठेवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदरची प्रक्रिया हि (ता. ११) फेब्रुवारी २०२२ रोजीच पूर्वनियोजित पत्रानुसार सरपंच पदासाठीच घेण्यात यावी. अन्यथा (ता.११) फेब्रुवारी पासून आपल्या कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसावे लागेल असा इशारा महिपाळे यांनी दिला आहे.

579 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.