सोयाबिन पिकांच्या बियाण्यांची कृत्रिमटंचाई ; कृषी विभागासह प्रशासनाचे दुर्लक्ष
किनवट ता.प्र दि ०७ शेतक-यांना मागच्या वर्षी कापुस या पिकाने धोका दिल्याने किनवट तालुक्यात यावर्षी खबरदारी म्हणून शेतक-यांनी कापुस या पिकाच्या लागवडीकडे पाट फिरवल्याने शेतक-यांचा मोर्चा हा सोयाबिय या तेल वर्गीय पिकाकडे वळला आहे यामुळे सोयाबिय पिकाचा उतारा मोठ्या प्रमाणात होणार आहे तर या करिता आवश्यक अशा सोयाबिन च्या बियाणाचे कृत्रिम टंचाई बाजारात सुरु झाली आहे त्यामुळे काही प्रमाणात सोयाबिन या पिकांच्या बियाण्यांची कालाबाजारी सुरु झाली आहे होत असलेल्या या प्रकाराकडे कृषी विभागासह प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने शेतक-यांना जास्त दराने सोयाबिन च्या बियाण्यांची विक्री केली जात आहे तर सर्वसामान्य शेतक-यांना हे बियाणे प्राप्त करतांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.
सध्याच्या परिस्थितीत सोयाबिन या तेल बियाचे दर बाजारात तेजीत आहेत यामुळे सोयाबिन तेल १६० रु प्रति लिटर पर्यंत दर वाढलेले आहेत परंतु शेतक-यांचे नियोजन नेहमी सारखे या ही वर्षी चुकणार असे निदर्शनास येत आहे, कारण भेड चाल करत सर्वच शेतक-यांने सोयाबिन या पिकाची पेरणी केली तर काढणी नंतर बाजारात सोयाबिन ची आवक वाढेल त्यामुळे आपोआप त्याचे दर कोसळतील यामुळे आज जी तेजी सोयाबिन मध्ये पहावयास मिळत आहे ती तेजी सोयाबिन बाजारात आल्या नंतर ही राहिल याची शक्यता खुप कमी आहे त्यामुळे शेतक-यांनी आपल्या शेतात सर्वच पिकांचे समतोल राखले तर सर्वच शेतक-यांना त्यांच्या पिकांचे भाव ही समतोल प्रमाणात मिळतील परंतु याची शक्यता अत्यंत कमी आहे कारण आपल्या कडे शेजारच्या शेतक-यांने जे पेरले तेच आजुबाजुचे शेतकरी पेरतात. अशा स्थितीत बाजारातील उलाढालीत अत्यंत महत्वाचे घटक असलेले शेतकरी हे त्यांच्या काबाडकष्ट करुन उगवलेल्या पिकांना योग्य भाव प्राप्त करुन घेण्यात मागे राहुन जातात या करिता अनेक देशात समुह शेती, कंत्राटी शेती, कॉरपॉरेट शेती अशे काही शेतीचे प्रकार आहे ज्याव्दारे मोठ्या प्रमाणात समान क्षेत्रात एकाच पिकाची उगवण अत्यंत मोठ्या प्रमाणात केली जाते जेणे करुन योग्य दर प्राप्त झाला तरच तो माल विकला जातो व शेतक-यांची एकाधिकारशाही निर्माण होते व त्यांना हवे दे पिकांना भाव प्राप्त करता येते परंतु आपल्या देशात धुर्रे, भाऊबंदकी, वाटनी मध्ये शेती गुरफटली आहे. त्यामुळे आपल्या देशाच्या शेतक-यांना नविन तंत्रज्ञान शिकुन शेती करण्याकरिता एवजी पारंपारीक शेतीकरत असल्याने आपल्या देशातील शेतकरी हे या क्षेत्रात ही मागे राहिले आहे.
यामुळे आपल्या देशाच्या शेतक-यांना त्यांच्या पिकांच्या भावात समतोल राखता येत नाही व अतोनात नुकसान होत आहे. याबाबीचा विचार तालुक्यातील कोणताही शेतकरी नेता किंवा लोकप्रतिनिधी करतांना दिसत नाही.