किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

सीमेवर शत्रूला चित केले मात्र नात्यात हरले;माजी सैनिकाचा मुलानेच केला दगडाने ठेचून खून

नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड

*नांदेड*:दि.7. जिल्यातील अर्धापूर शहरात काही गोष्टी पुढे सगळी नाती फिकी पडतात.असाच काळजाचा ठोका चुकावणारा प्रकार नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात समोर आला आहे.लहुजी नगर येथे राहणारे माजी सैनिक नारायणराव साबळे यांना जन्मदात्या मुलाने मारहाण केली यात दगडाचा जब्बर मार लागल्याने गंभीर जखमी झालेल्या पित्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून या प्रकरणी आरोपी मुलास पोलिसांनी अटक केली आहे.

नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर शहरात लहुजी नगर येथे राहात असलेले सेवानिवृत्त माजी सैनिक नारायणराव लक्ष्मण साबळे यांना दि.६ नोव्हेंबर रोजी दुपारी जुन्या भांडणाचा राग मनात धरून मुलगा विजय साबळे वय ४५ वर्ष,सोबत सौ.साबळे वय ४० ,मुलगा शुभम विजय साबळे १८ सहकार्य केले.विजय याने बुक्या व दगडाने मारहाण केली यात दगडाचा जबर मार लागल्याने वडील नारायण साबळे हे गंभीर जखमी झाले.असता मयताचा छोटा मुलगा दिलीप साबळे व पत्नी गयाबाई यांनी अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मयत झाल्याचे सांगितले.

सेवानिवृत्त सैनिक नारायणराव साबळे यांच्या खून प्रकरणी दिलीप नारायण साबळे यांच्या फिर्यादीवरून आरोपी विजय नारायणराव साबळे,शुभम विजय साबळे,सौ.साबळे तिघाजना विरूद्ध कलम ३०२,३२३,५०४,५०६,३४ भादवी प्रमाणे अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक जाधव हे करीत आहेत.

*१९६५-७१ च्या भारत पाकिस्तान युद्धात सहभाग*

1965 – 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धामध्ये सेवानिवृत्त सैनिक नारायणराव साबळे यांचा सहभाग होता.या युद्धामध्ये त्यांच्या मांडीला एक गोळी लागली होती यामुळे त्यांना काही प्रमाणात अपंगत्व आले होते

507 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.