किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

काळ्या बाजारात जात असलेले रेशन धान्य गावकऱ्यांनी रंगेहात पकडले*जिल्यात स्वस्त धान्य काळ्या बाजारात विक्रीचे प्रमाण वाढले

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.29.जिल्यातील किनवट तालुक्या मधील इस्लापुर कोसमेट येथील स्वस्त धान्य दुकान क्र,60 चे परवाना असलेले चालक मनीष कुंदनलाल जैस्वाल हे महिंद्रा बोलेरो पिकअप गाडी क्र,AP01 X3944 या गाडी मध्ये गहू 58 पोते पैकी दोन पोते खराब मालाचे होते.

प्रत्येकी पोत्यात 50 किलो धान्य एकूण 29 क्विंटल माल होता ज्याची 2500 प्रमाणे अंदाजीत किंमत 72500 रु.असुन वाटप न करता काळ्या बाजारात विकण्यासाठी शासकीय धान्य खाजगी गाडी मध्ये भरून वाहतूक करत असल्याचे गावकऱ्यांनी रंगे हात पकडले.स्वस्त धान्य दुकान कोसमेट येथून टेम्पोमध्ये माल भरत असताना गावकऱ्यांना शंका येऊन हा टेम्पो पकडण्यात आला, दुकानदारास विचारपूस केली असता हा माल सोनपेठ येथे स्वस्त धान्य दुकानांमध्ये वाटप करण्यासाठी नेत होतो असे सांगितले.शासकीय गोदाम इस्लापूर येथून सोनपेठ येथे डायरेक्ट माल का घेऊन गेले नाही,हा माल काळ्या बाजारात जात आहे हे नक्की झाल्यावर
त्या संबंधी तलाठी विश्वास फड यांना कळविले असता.त्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व मालासह गाडी ताब्यात घेऊन करंजी येथील पोलिस पाटील विलास गंगाराम व्यवहारे यांच्या ताब्यात दि.25/11/2022 रोजी देण्यात आली.आज 26/ नोव्हेंबर 2022 रोजी सदरील प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नायब तहसीलदार रफीक मोहम्मद शेख व तलाठी विश्वास फड यांनी कोसमेट व सोनपेठ येथील दुकानातील शिल्लक मालाची चौकशी व तपासणी करून सदरील स्वस्त दुकानातील काळ्या बाजारात जात असलेल्या गाडीतील गव्हाचे पोते करंजी येथील पोलिस पाटील यांच्या ताब्यात ठेवलेला माल इस्लापूर येथील शासकीय गोडाऊन विशाल संतोष दुधेवाड गोडाऊनपाल यांच्या ताब्यात दिला आहे.

सदरील प्रकरणाची चौकशी करून उपविभागीय अधिकारी किनवट यांच्या कार्यालयात पाठवण्यात येईल असे नायब तहसीलदार रफीक शेख यांनी माहिती दिली . सदरील पंचनामा केल्याची प्रत मागितली असल्यास संबधीत अधिकार्‍याकडून टाळाटाळ करण्यात आली.टेम्पो तील माल उतरून टेम्पोचा काय करणार असे विचारला असता गाडीचे कागदपत्र व आरसी बुक घेऊन सोडून देणार असे नायब तहसीलदार यांनी सांगितले. सोनपेठ येथील स्वस्त धान्य दुकानाचा माल कोसमेट येथे कसा काय उतरवण्यात आला आणि कोसमेट येथून सोनपेठला घेऊन जातात स्वस्त धान्य दुकानदार यांनी परमिट कधीच घेतला आहे आणि त्या परमिटवर कुण्या गाडीचा नंबर दिलेला आहे याची चौकशी सुद्धा व्हावी असे नागरिकातून बोललेल्या जात आहे.महिंद्रा बोलेरो पिकप गाडीचा मालक हा शिवनी येथील भुसार दुकानाचा मोठा व्यापारी असल्यामुळे त्यांच्या दुकानात माल जात असल्याचे शंका वर्तवण्यात येत आहे.तेव्हा महसूल प्रशासन यावर कोणते पाऊल उचलणार याकडे परिसरातील जनतेचे लक्ष वेधले आहे.

130 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.