जिवती – कुंभेझरी रस्त्याचे डांबरीकरण काम लवकर पूर्ण करा -उपसरपंच लहुजी गोतावळे
जिवती /प्रतिनिधी: जिवती – कुंभेझरी रस्त्याचे डांबरीकरनाचे अपूर्ण असलेले काम लवकर पूर्ण करण्यात यावे अशा आशयाचे निवेदन राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे -उपसरपंच लहुजी गोतावळे यांनी केले आहे.
जिवती ते कुंभेझरी हा रस्ता मुख्यमंत्री ग्रामसडक या योजनेअंतर्गत डांबरीकरण मंजूर झालेले आहे. परंतु मागील एक वर्षापासून फक्त ठेकेदारामार्फत खडीकरण करण्यात आले आहे. सदरील कामाकरिता निधी उपलब्ध नाही असे सांगून सदरील ठेकेदाराने काम बंद केले आहे. तरी सदरहू मार्ग जवळपास दहा ते पंधरा गावांना तालुक्याला जोडणारा मुख्यमार्ग असून सदरील कामाबाबत आपल्या स्तरावरून माहिती घेऊन तात्काळ डांबरीकरण पूर्ण करण्यात यावे व सामान्यांना होणारा त्रास दूर करावा अशा प्रकारची निवड विनंती निवेदनाद्वारे कुंभेझरीचे तरुण तडफदार युवा उपसरपंच श्री लहुजी अर्जुन गोतावळे यांनी ग्रामविकास मंत्र्याकडे केली आहे.
सदरील रस्ता अत्यंत महत्त्वपूर्ण असून हा रस्ता अनेक वर्षापासून अत्यंत खराब स्थितीमध्ये आहे. या रस्त्यात अनेक अपघातही झालेले आहेत. तसेच तालुक्याला अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी व पेशंट दवाखान्यासाठी तसेच इतर नागरिक महत्त्वपूर्ण कार्यासाठी तालुक्याच्या ठिकाणी ये जा करतात. त्यामुळे सदरील रस्ता कायमच रहदारीसाठी गर्दीचा असतो.
तसेच जिवती तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत असलेले कुंभेझरी या गावाचा व गट ग्रामपंचायत च्या सर्व गावांचा विकास करण्याच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा या याबाबतीत चंद्रपूरचे खासदार मा.बाळूभाऊ धानोरकर यांना प्रत्यक्ष भेटून त्यांना निवेदन सादर केले आहे.
याविषयी लोकप्रतिनिधी व शासन काय निर्णय घेतात याकडे सर्व तालुकावाशीयांचे लक्ष लागून आहे.