महामार्गाचे खोदकाम करताना शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटली. नगरपंचायतीने लक्ष देण्याची गरज.
श्रीक्ष्रेत्र माहूर /पद्मा गिऱ्हे
माहूर शहरातून जाणाऱ्या धनोडा ते कोठारी राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून गूत्तेदाराने गेल्या दोन वर्षांपासून दत्तचौक (टि पॉईंट) ते स्टेट बँकेपर्यंत केवळ खोदकाम करून ठेवले सदरचे खोदकाम करतांना शहराला पाणीपुरवठा करण्यात येणारी पाईपलाईन फूटल्याने शहराच्या काही भागाचा पाणीपुरवठा गेल्या दोन वर्षांपासून बंद झाल्याने नागरिकांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत. तसेच रस्त्यालगतच्या हातावर पोट असलेल्या व्यापाऱ्यांचे व्यवसाय बंद पडल्याने त्यांचेवर उपासमारीची पाळी आली.याबाबत नागरिकांनी संबधितांकडे अर्ज विनंत्या केल्या परंतू कूंभकर्णी झोपेत असलेल्या संबंधित विभागाने या गंभीर बाबीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्षच केले.असून गेल्या दोन वर्षांपासून रस्त्याचे काम रखडत ठेउन गूत्तेदाराने जनू निश्क्रीयतेचा कळसच गाठला असून या गंभीर बाबीकडे नगर पंचायत प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे माहूरवासियांन कडून अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यातच दिनांक 26फेबूरवारी 2022 रोजी सर्वज्ञ पॅलेस समोरच्या रस्त्याचे खोदकाम करतांना संपूर्ण शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य पाईपलाईन फुटलयाने हजारो लीटर पाण्याची नासाडी झाली. नूतन नगराध्यक्ष फिरोज दोसानी, पाणीपुरवठा सभापती अशोक खडसे, नगरसेवक रणधीर पाटील प्रभाग क्रमांक 13 चे नगरसेवक गोपू महामूने यांनी जायमोक्यवर जाउन पाहणी केली असून शहराचा पाणीपुरवठा खंडीत होउन पाण्यासाठी नागरिकांचे हाल होऊ नये यासाठी
संबधीत गूतेदाराला विनाविलंब पाईपलाईन दुरूस्त करून दोनवर्षापासुन रखडलेले काम लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत सूचना देणार असल्याचे आमच्या प्रतिनिधीला सांगितले .