किनवट येथे गॅस,पेट्रोल-डिझेल इंधन दरवाढ विरोधात युवक काँग्रेस चे आंदोलन!!
किनवट तालुका/ प्रतिनीधी
देशभरात वाढत चालेल्या इंधन दरवाढीच्या विरोधात आज युवक काँग्रेसने किनवट येथील नेमानिवार पेट्रोल पंपासमोर जोरदार आंदोलन केले. युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शने करत मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करत आहेत.याचाच एक भाग म्हणून किनवट येथे युवक काँग्रेस च्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार वर टीकास्त्र सोडले.
केंद्र सरकार इंधनाचे दर कमी करण्याऐवजी इंधनावर कर वाढवून दरवाढ करत आहे. संपूर्ण देशात एकीकडे कोरोनाचा कहर सुरु असुन उद्योगधंदे ठप्प आहेत, रोजगाराचा पत्ता नाही, महागाई प्रचंड वाढली, शेतीमालाला बाजारपेठ व भाव नाही, देशातील सप्लाय चेन आधीच अडचणीत असुन यात ईंधन दरवाढी मुळे वाहतूक दरात वाढ होऊन अजुन प्रचंड महागाई वाढणार आहे. रोजगार नसल्यामुळे जनतेचा खिसा खाली होत आहेत. या दरवाढी मुळे गोरगरीब, मध्यमवर्गीय, शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्य जनतेचे जगणे कठिण झाले असुन ईंधन दरवाढ कमी करावी यासाठी केंद्रातील मोदी सरकारचा निषेध करुन ईंधन दरवाढ कमी करावी अशी मागणी युवक काँग्रेस च्यावतीने करण्यात येत आहे.
यावेळी काँग्रेसचे नेते तथा तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी, व्यंकटराव नेमानिवार,गिरीश नेमानिवार, आशिष कऱ्हाळे,नवीन राठोड, के.स्वामी, स्वामी नुतपेल्लीवार, अभय महाजन, रमेश राहुलवार सर,फारुख चव्हाण, ईश्वर चव्हाण, लक्ष्मीपती दोनपेल्लीवार, समशेर खिच्ची,जावेदआलम, स.अन्वर,स.फक्रोद्दिन, माधव खेडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते.