हिंगोली लोकसभा मतदारसंघ काँग्रेसकडेच राहावा -धनराज राठोड, सरचिटणीस ओबीसी विभाग यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी लोकसभा संसदीय समितीकडे मागणी.
मुंबई : हिंगोली लोकसभा मतदारसंघ तीन जिल्ह्यात विभागला गेलेला आहे हिंगोली, कळमनुरी, वसमत, हदगाव, किनवट व उमरखेड या विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. हिंगोली लोकसभेतून स्वर्गीय उत्तमरावजी राठोड हे निवडून गेले व 2014 मध्ये भाजपच्या लाटेत सुद्धा काँग्रेस कडून नांदेड व हिंगोली हे दोनच खासदार निवडून आले होते. लोकसभा हा बंजारा व ओबीसी बहुल आहे त्याचा परिणाम नांदेड यवतमाळ व मराठवाड्यातील सर्व लोकसभेवर होईल हिंगोली लोकसभा हा मतदारसंघ प्राधान्यक्रमाने काँग्रेसकडे घ्यावे अशी मागणी श्री धनराज राठोड सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभाग यांनी मुंबई येथील काँग्रेस मुख्यालय भवन येथे लोकसभा आढावा बैठकीमध्ये मागणी केली आदरणीय प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब व आदरणीय श्री अशोकरावजी चव्हाण साहेब माजी मुख्यमंत्री यांनी हिंगोली लोकसभा काँग्रेसकडे जाणार अशी ग्वाही दिली. यावेळी आमदार श्री माधवराव पाटील जळगावकर, आमदार श्रीमती प्रज्ञाताई सातव, काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष, माजी आमदार श्री भाऊराव पाटील गोजेगावकर व श्री यादवराव जाधव यांनी आपली मते मांडली.