किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

विद्यार्थीनीवर जबरी संभोग करणा-या लिंगपीसाट शिक्षकास पोलिसांनी केले जेरबंद

किनवट = (ता.प्रतिनिधी) अल्पवयीन विद्यार्थीनीला वेगवेगळे प्रलोभणे दाखऊन गोकुंदा येथिल राहत्या रुमवर नेऊन तिन दिवस जबरी संभोग करणार्‍या जितेंद्र धोंडे या कामांध शिक्षकाविरुद्ध अगदी शिक्षकदिनाच्या पूर्वसंधेला (४ सप्टेबर २०२३ रात्री ८.१४ वा.) किनवट पोलीसात पोक्सोसह विविध गुन्ह्याच्या नोंदी करण्यात आल्याअसून समय सूचकता लक्षात घेत पोलीसांनी त्यास अटकही केली आहे. जिल्हा परिषद हायस्कूल पार्डी-बोधडी खुर्द या शाळेवरील हा शिक्षक आहे. २२ ते २४ जुलै दरम्यान व त्यानंतर सुद्धा त्याने कृत्य केले. शिवाय शाळेतही अश्लील चाळे करीत असल्याचे त्या निरागस विद्यार्थीनीने पोलीसांना दिलेल्या जबाबात इतीवृत्त सांगितले आहे.
आधार कार्ड, फोटो, पोस्टाचे खाते काढून देतो, खाजगी शिकवणीचे प्रलोभन दाखवून तिच्यावर शाळा सुरु झाल्यापासून दर शनिवार व रविवारी शिकवणीच्या बहाण्याखाली गोकुंदा येथे विद्यार्थीनीला आणून तीन दिवस जबरदस्तीने बलात्कार केल्याच्या आरोपाखाली पोलीस निरीक्षक दीपक बोरशेंच्या आदेशावरुन स.पो.नि.वाठोरेंनी गुन्ह्याची नोंद करुन पुढील कार्यवाहीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी मलघणे यांच्याकडे प्रकरण वर्ग केल्याचे समजते. गु.र.नं.२१६/२०२३, कलम ३७६ (अ ब),(ई),(२),(फ), ३७६ (आय)(न),३५४,२२३,५०६ भादंवी व सहकलम ४,६,८,१२ पोक्सो व कलम ३(i)(w)(i),३(२)(v)अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्ह्याच्या नोंदी केल्या आहेत.
जिल्हा परिषद हायस्कूल पार्डी-बोधडी खुर्द या शाळेच्या उज्वल भविष्यासाठी बोधडी खुर्द, पार्डी खुर्द, येंदा-पेंदा, भूलजा, कोपरा अशा विविध गावातील पुर्वजांनी, जेष्ठांनी अथक परिश्रम घेतले होते. म्हणून या शाळेचे पावित्र्य भंगले नव्हते. आज या कामांधमास्तराच्या वेदनादायी घटनेने त्यावर पाणी फेरल्याच्या प्रतिक्रिया आहेत.

213 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.