कम्युनिस्ट चळवळीचे अग्रगण्य नेते कॉम्रेड उत्तमरावजी राठोड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन
,किनवट प्रतिनिधी
कम्युनिस्ट चळवळीचे अग्रगण्य नेते कॉम्रेड उत्तमरावजी राठोड यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुःखद निधन झाले असून दि 9 सप्टेंबर रोजी मुंगसी या गावी त्यांच्यावर अश्रूपूर्ण नयनानी अंत्यसंस्कार करण्यात आले.त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातू नातवंडे असा मोठा परिवार आहे.
माहूर तालुक्यातील मुंगशी येथील मूळ रहिवासी असलेले कम्युनिस्ट चळवळीचे अग्रगण्य नेते कॉम्रेड उत्तमरावजी राठोड यांचे दि 8 सप्टेंबरच्या रात्री हृदयविकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. मृत्यू समयी ते 74 वर्षाचे होते त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंड असा मोठा परिवार आहे. दैनिक गावालाचे तालुका प्रतिनिधी प्रतिनिधी दुर्गादास राठोड यांचे ते वडील होत.
किनवट सारख्या मागास दुर्गम भागात ते गेल्या 40 वर्षापासून कम्युनिस्ट चळवळीमध्ये एक निष्ठेने काम करणारे नेते म्हणून ते परिचित होते.कष्टकरी कामगार वर्गाच्या हितासाठी त्यांनी अनेक आंदोलने केली संत सेवालाल महाराज कोण होते? हे पुस्तक लिहून कॉ उत्तमराव राठोड यांनी गोरबंजारा समाजामध्ये जागृती निर्माण केली. त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच मुंगशी गावासह तालुक्यात शोकळा पसरली असून 9 सप्टेंबर रोजी मुंगशी येथे त्यांच्या पार्थिव देहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यसंस्काराला पोहरादेवी येथील महंत बाबू सिंग महाराज, दैनिक गावालाचे कार्यकारी संपादक विजयभाऊ दगडू, नांदेड येथिल कॉ प्रदीप नागापूरकर अर्जुन आडे लोकनेते ज्योतिबा खराटे माजी जि प उपाध्यक्ष समाधान जाधव माजी जि प सदस्य संजय राठोड बंडूसिंग नाईक प्रा कैलास राठोड, माजी सभापती दत्तराव मोहिते बंडू भुसारे अनिल पाटील कराळे, बंजारा क्रांती दलाचे प्रदेशाध्यक्ष नंदूभाऊ पवार, सरपंच कैलास जाधव, सुभाष बाबू नायक राठोड,किशोर पाटील पवार,विकास कुडमुते, कुंदन पवार, नामदेव राठोड ज्येष्ठ पत्रकार तथा भाजपा नेते राघू मामा,, पत्रकार शकील बडगुजर, किरण ठाकरे, रविराज कानिंदे,जयपाल जाधव, कॉम्रेड शिवाजी फुलवले, गोर सेनेचे तालुका अध्यक्ष अतुल जाधव प्रफुल राठोड,सचिन जाधव, यांच्यासह राजकीय व सामाजिक क्षेत्रातील नेते कार्यकर्ते व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान कॉम्रेड उत्तम राठोड अमर रहे कॉम्रेड उत्तम राठोड को लाल सलाम या जयघोषाने परिसर दणाणून सोडला होता.