किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

चोरीला गेलेली मोटारसायकल मिळाली;प्रेस संपादक व पत्रकार संघाचे युवा ता.सचिव पत्रकार मारोती देवकते यांचे कौतुक

किनवट/प्रतिनिधी: किनवट येथील आठवडी बाजारातून चोरीला गेलेली मोटरसायकल प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे युवा तालुका सचिव मारोती देवकते यांच्या सहकार्याने परत मिळाली. त्यामुळे त्यांचे किनवट शहरात व परिसरात कौतुक होत आहे.
किनवट शहरात एकूण जवळपास वीस ते तीस खेडेगावातून सर्वसाधारण तसेच छोटे मोठे व्यापारी मंडळी आठवडी बाजारकरिता येत असतात.याच बरोबर लघु व्यापारी आपले भाजीपाला व इतर साहित्य मोटारसायकल वरून प्रवास करून साहित्य आणतात.
गाडी चोरी केलेला आरोपी
बाजारात ठराविक ठिकाणी आपली असलेली मोटारसायकल लाऊन जवळ असलेले भाजीपाला व इतर वस्तू विकत असतात…पण काही चोरट्यांनी या बाजारात आसलेली गर्दीचे फायदा उचलत मोटार सायकल चोरी करून पलायन केली जातात..असे काही महिन्यांपासून चोरीचे प्रमाण वाढले आहे. काल तारीख १० रविवारी रोजी गोंडराजे मैदान येथे आठवडी बाजारमध्ये बाजार करण्याकरिता अनिल गीते राहणार शनिवारपेठ या व्यक्तीने आपली असलेली मोटार सायकल MH २६ z ९४१४ असे क्रमांक असलेली गाडी श्रीराम मोटार रीवायडींग या नावाचे असलेली दुकानासमोर लाऊन बाजार करू लागला.
पत्रकार मारोती देवकते
परंतु काही वेळात बाजार झाल्याने गाडी लावलेल्या ठिकाणी आपली गाडी दिसली नाही.शोधाशोध करून त्यांच्या लक्ष्यात आले की, अज्ञान व्यक्तीने आपली गाडी चोरून नेली आहे हे जवळ असलेल्या cctv कॅमेराच्या माध्यमातून चित्रीकरण घेतले. आपले असलेली मित्रमंडळी तसेच नातेवाईक यांना व्हॉटसअप द्वारे वायरल करण्यात आले. शोधाशोध करण्यात रात्र झाली असल्याने पोलिसांना तक्रार करण्याकरिता सकाळी अंदाजे दहा ते अकरा च्या दरम्यान तक्रार नोंदविले.आणि गाडी शोधण्यास जवळचे असलेले सहकारी पत्रकार मारोती देवकते व व्यजनाथ फड यांना सोबत घेऊन किनवट ते सोनाला मार्ग जात असताना देवकते यांच्या कल्पनेने शोधाशोध करीत होते. अचानक चिखलीहून फोन आला व ताबडतोब येण्यास सांगितले.मारोती देवकते क्षणाचाही विचार नकरता सांगितलेल्या ठिकाणी काही मिनिटात पोहचले.चोरी गेलेली गाडी निदर्शनात आल्याने गाडी घेऊन पलायन करीत असलेलं चोर यांना पकडुन पोलीस स्टेशन किनवट येथे कळविले आणि काही वेळात पोलीस गाडी सुद्धा पोहचली.त्या चोरट्याला व गाडीला घेऊन पोलीस स्टेशन किनवट येथे सादर केले.
किनवट शहरात दिवसेंदिवस गाडी चोरी जाण्याची संख्या वाढतच आहे. एकदा चोरी गेलेली गाडी मिळेल ही आशा गाडी मालक सोडूनच दिले. परंतु काही वेळात पत्रकार मारोती देवकते यांनी रचलेल्या जाळ्यातून चोर व गाडी परत मिळवून दिल्याने मित्र मंडळी व पत्रकार संघातून कौतुक केले जात आहे.

565 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.