किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

कोठारी सिंध येथील कापूस उत्पादन वाढ व मूल्य साखळी या प्रकल्पांतर्गत शेतीशाळेत कृषी अधिकार्‍यांचे मार्गदर्शन

मांडवी प्रतिनिधी
किनवत कृषी विभागामार्फत आज दि.13/08/022 रोजी कोठारी (सी)येथे रा.पु.ए. कापुस उत्पादन वाढ व मूल्य साखळी वि.योजने अंतर्गत शेतीशाळा वर्ग घेण्यात आले सदर शेतीशाळेस गावातील प्रकल्पातील नोदणीयुक्त शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मा. तालुका कृषी अधिकारी श्री बी. बी. मुंडे यांच्या हस्ते योजनेतील प्राप्त निविष्ठा ( कीटकनाशके) वाटप करण्यात आले तसेच सदरील शेतीशाळेत विविध प्रकारचे विषय मांडण्यात आले सदरील कार्यक्रमास कृषि सहाय्यक श्री. एस.डी निळकंठवार यांनी प्रस्तावना माडली. शेतीशाळेतील मार्गदर्शना नुसार अवलंबलेल्या बाबीवर शेतकर्‍या सोबत चर्चा झाली .शेतकऱ्यांनी सद्यस्थितीत कापुस पिकात मावा तुडतुडे आणि पांढरी माशी या रस शोषक किडीचा प्रादुर्भाव जास्त होत आहे असे निर्दशनास आणुन दिले. कृषि पर्यवेक्षक जी डी भालेवाड यांनी कापूस पिकातील सर्व किडी विषयी चर्चा करुन प्रादुर्भाव होण्याचे कारणे आणि त्यावर रासयनिक आणि जैविक पद्धतीने नियंत्रण करवायाचे विविध उपाय सांगितले यात डावरणी करताना पिवळे रंगाचे प्लास्टिक कापडाचे सापळे वापरुन कमी खर्चात किडीच्या व्यवस्थापना करण्याची माहिती सांगितली सध्या कापूस पिकाची आवश्यक अशी वाढ होण्यासाठी विद्राव्य खत सोबत किडी विषयी श्री तालुका कृषी अधिकारी बी बी मुंडे यांनी खत व्यवस्थापन व फवारणी कशी व कोणती करावी त्याबाबत माहिती दिली. किटक नाशकाची फवारणी कराताना घ्यावयाची काळजी बाबत माहिती दिली.

अति पाऊस पडल्याने सध्या नाही परंतु भविष्यात उद्भवणाऱ्या गुलाबी बोंड अळीचे जीवनचक्र व त्याच्या चक्रातील विविध टप्पयावर बंदोबस्त करण्यासाठी जैविक, रासयनिक आणि मशागती पध्दतीने नियंत्रण कसे करता येईल याबाबत मार्गदर्शन करुन विविध चित्राव्दारे कीटक व मित्र कीड याची माहिती श्री.बी आर मुनेश्वर मंडळ कृषी अधिकारी किनवट यांनी माहिती दिली.शेतीशाळेत शेतक-यांना मित्र आणि शत्रु किडींची ओळख करुन दिले. त्यांनतर शेतीशाळेतील पाच शेतकरी गटानी कापुस पिकांची निरीक्षणे करुन आपआपले कागदावर चित्राव्दारे मित्र किडी आणि शत्रु किडी यांचे चित्रे काढुन रंगवुन दाखविण्याचा प्रयत्न केले. श्री एस डी शेवाळे यांनी Mahaviz(Fipronil +Acetamaprid) तसेच emamectin benzoate या बाबत वाटपा पुर्वी त्यांचा उपयेाग आणि फवारणी विषय माहिती सांगितले व त्यानंतर वाटप करण्यात आले. तसेच त्याचा उपयोग अणि महत्व सांगुन वाटप करण्यात आले. शेतीशाळेत निविष्ठा वाटप करण्यात आल्या व त्याबद्दल श्री एस डी निलकंठवार यांनी माहिती दिले. आणि उपक्रमशिल शेतकरी श्री जयवंत कांबळे यांनी मागील शेती शाळेतील आढावा घेऊन शेती शाळेतील निरीक्षणा बद्दल सविस्तर माहिती दिली. त्यांनतर काही शेतकरी आपले मनोगत व्यक्त केले. सदरील शेतीशाळेत फुग्याचा खेळ खेळण्याकरीता शेतकरी उत्साहाने भाग घेऊन आंनदीत झाले. या खेळाने शेतीतील पीक आपण कसे वाचून ठवावे ते बोध घेण्याचे सागितले. सदरील कापुस शेतीशाळा करिता श्री. तालुका कृषि अधिकारी श्री. मुंडे साहेब, मंडळ कृषि अधिकारी श्री.बी आर मुन्नेश्वर साहेब तसेच कृषि पर्यवेक्षक श्री.भालेवाड साहेब,कृषि सहाय्यक निलकंठवार . कृषी सहाय्यक एस डी शेवाळे यांच्या मार्गदर्शन लाभले मौजे कोठारी (सि)येथिल लाभार्थी शेतकरी यांच्या सहकार्यामुळे आजची शेतीशाळा संपन्न झाली.

246 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.