किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

रयत रुग्णालयाची नांदेडात भरारी

*नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड*

*नांदेड*:दि.12.येथील प्रसिध्द अस्थिरोगतज्ज्ञ डॉ.सुरेश खुरसाळे यांच्या संकल्पनेतुन गोर गरीबांना कमी पैश्यात उपचार मिळाले पाहीजेत यासाठी नांदेड येथील सोमेश कॉलनीत रयत रुग्णालय उभे केले.सुरुवातीला या रुग्णालयाला फारसा कांही प्रतिसाद मिळाला नसला तरी कालांतराने डॉख़ुरसाळे यांच्या प्रयत्नानंतर पुन्हा एकदा या रुग्णालयात गोर गरीबांची उपचारासाठी गर्दी वाढली आहे.

या रुग्णालयाकडे जिल्ह्यातील नामदार,खासदार,आमदार या सर्वांनी दुर्लक्ष केल्यानंतरही या रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचा-यांनी मेहनत करुन रयत रुग्णालयाला पुन्हा एकदा चांगले दिवस आणले आहेत,त्यामुळे लोकांनी लोकांसाठी चालवलेले…लोकांचे रयत रुग्णालय नांदेडात घेत आहे भरारी.

नांदेड शहर आरोग्य व उपचाराच्या दृष्टीकोनातुन हब झाले आहे. मोठ्या प्रमाणात मल्टीस्पेशालीस्ट हॉस्पीटल निर्माण होत आहेत.नांदेड शहर हे कर्नाटका,तेलंगनाच्या सिमेवर असल्यामुळे या ठिकाणी रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात काम करणा-या सगळ्यांचेच चांगभले होत असले तरी गोरगरीबांकडे लक्ष देण्याची कोणालाच वेळ नाही.नामदार, खासदार,आमदार यांच्या नातेवाईकांचीच मोठ्या प्रमाणात रुग्णालय थाटल्या जात आहे. अशा भाऊ गर्दीत गरीबांसाठी रुग्णालय कोण काढणार त्यांना शासकीय रुग्णालयाशिवाय पर्याय नाही.

अशा वेळी डॉख़ुरसाळे यांनी शहरातील दानशुर व्यक्तींना एकत्रित करुन त्यांच्याकडून निधीप्राप्त करुन घेतला. नामवंत डॉक्टरांना कमी मानधनात सेवा देण्याचा विनंती केली.त्यांच्या विनंतीला मान देवून अनेक नामवंत डॉक्टर या ठिकाणी सेवा देत आहेत.

रयत रुग्णालयात २४ तास अत्यावश्यक सेवा उपलब्ध आहे. एक्स रे,पॅथॉलॉजी,कोवीड-१९, प्रोफाईल व इतर तपासण्या अल्पदरात उपलब्ध आहे., ३२ लाईट सिटी स्कॅन (सिमेन्स कंपनी) माफक दरात उपलब्ध. कार्डियाक अ‍ॅम्बुलन्स अल्पदारात उपलब्ध.वैद्यकीय शास्त्रातील बहुतांश आरोग्य सेवा उपलब्ध, कृत्रिम पाय जयपूर फूट सेंटर, २४ तास मेडीकल स्टोअर व लो कॉस्ट कंपनीची दर्जेदार व स्वस्त औषधी उपलब्ध, १५ मानसेवी तर १३ पूर्णवेळ डॉक्टर्स कार्यरत, काही रुग्णखाटा १०० टक्के सवलतीमध्ये अत्यंत गरीब रुग्णांसाठी उपलब्ध आहे, बा तपासणीसाठी केवळ ५० रु.फिस आहे, डिजीटल एक्स-रे सिंगल व्हयू १८० रुपये तर डबल व्हयू ३०० रुपये,सिझीरियन,गर्भाशय काढणे,फॅक्चर जोडणी शस्त्रक्रिया इ.मेजर शस्त्रक्रिया प्रत्येकी ७००० रुपये पेक्षा कमी, इमर्जन्सी रुम २०० रुपये, स्पेशल रुम ४०० रुपये,सामान्य रुग्णालयासाठी आंतररुग्ण शुल्क १३० रुपये,दारिद्रय रेषेखालील रुग्णांना सिटी स्कॅन मोफत इतर रुग्णांना मात्र ५० टक्के सवलत.
रयत रुग्णालयातील सेवेचा लाभ सर्व नागरीकांनी घ्यावा आणि आपल्या पैश्याची बचत करत चांगल्या आरोग्याचा लाभ रयत रुग्णालयातून उपचार करावे असे आवाहन रयत रुग्णालयातील प्रशासकीय अधिका-यांकडून करण्यात आले आहे.

475 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.