किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

लोकप्रिय खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्यावतीने विधानसभा संघटक सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली रक्तदान शिबिर संपन्न

किनवट शहर प्रतिनिधी ( राज माहुरकर)

हिंगोली लोकसभेचे कर्तव्यदक्ष खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सेनेच्यावतीने विधानसभा संघटक सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली येथील तहसील कार्यालयासमोर रक्तदान शिबिराचे भव्य स्वरूपात आयोजन केले होते या शिबिरात एकूण 154 जणांनी जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले असून शिबिरात मुस्लिम समाजातील तरुणांनी लक्षणीय सहभाग घेतल्याने या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले तर ठिकठिकाणचे वाढदिवसाचे बॅनर व रस्त्याच्या दुतर्फा लावलेल्या भगव्या झेंड्यामुळे शहरात दिवसभर भगवे वातावरण दिसून आले
लोकसभेचे विकासाभिमुख,कर्तव्यदक्ष खासदार हेमंत पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त शिवसेनेचे विधानसभा संघटक सचिन नाईक यांच्या नेतृत्वाखाली युवा सेनेच्या वतीने उपजिल्हाप्रमुख प्रशांत कोरडे यांनी आज तहसील कार्यालयासमोरील प्रांगणात या शिबिराचे आयोजन केले होते
प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज व शिवसेना प्रमुख स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेचे पुष्प पूजन करून शिबिरास सुरुवात करण्यात आली
या शिबिराला शहरासह ग्रामीण भागातून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून शिबिरात एकूण 154 जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले विशेषतः मुस्लिम समाजातील युवकांनीही शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केल्यामुळे या कार्यक्रमाला विशेष महत्व प्राप्त झाले
नांदेड येथील गुरुगोविंदसिंगजी ब्लड बँकेचे डॉ प्रसाद बोरूळकर, डॉ प्रकाश कनकदंडे यांनी रक्तदात्याकडून रक्तसंकलन केले त्यांना प्रवीण देठे, बाबुराव माने राहुल वाघमारे,कु कोमल,कु सविता, कु सरस्वती आदींनी सहकार्य केले दरम्यान रक्तदान शिबिराचा कार्यक्रम, वाढदिवसाचे बॅनर व रस्त्यावरील भगव्या झेंड्यामुळे दिवसभर किनवट शहराचे वातावरण भगवे झाल्याचे दिसून येत होते
खासदार हेमंत पाटील यांचे किनवट माहूर तालुक्याच्या विकासाकडे विशेष लक्ष असून अवघ्या दोनच वर्षात त्यांनी या तालुक्यात त्यांच्या खासदार निधीतून करोडो रुपयाची पायाभूत कामे केल्यामुळे या तालुक्यात शिवसेनेला मोठ्या प्रमाणात जनतेचा प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे विधानसभा संघटक सचिन नाईक हे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष संघटन मजबूत करण्यावर जोर देत आहेत खासदाराच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेले हे रक्तदान शिबिराचा कार्यक्रम हा त्याचाच एक भाग मानला जात आहे याप्रसंगी तालुकाप्रमुख बालाजी मुरकुटे पाटील, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील, राम कोरडे पाटील, शहर प्रमुख सुरज सातूरवार, संतोष येलचलवार,मारुती संकुलवाड, मारुती दिवसे पाटील, खासदारांचे जनसंपर्क अधिकारी सुनील गरड, अविनाश नाईक, शरद जैस्वाल, प्रशांत कोरडे, प्रमोद केंद्रे, रघुनाथ चटेकर, पंडित रासमवार,कपिल रेड्डी, अतुल दर्शनवाड, अमोल जाधव, विनोद पवार, गजानन जाधव, सुनील राठोड, संदीप राठोड, नागेश चंद्रे, ज्योतिबा मंडलवार, आरिफ खान, आसिफ शेख, आकाश जाधव, चंदू जायभाये, मनोज तीरमनवार, घनशाम कराळे पाटील, संजय कराळे पाटील, गजानन बोंडारकर, अजय चव्हाण, हरीचल राठोड, सुनील राठोड, उमेश जाधव, गोकुळ राठोड, सुरज आडे, दिनेश पिल्लेवार, फिरोज शेख, अक्रम भाई, शेख मजहर, एल एल जाधव,अमर शेळके, विशाल हलवले यांच्यासह शिवसेनेचे आजी-माजी पदाधिकारी, सर्कल प्रमुख,शाखाप्रमुख व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते

520 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.