किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

चालक, वाहकांच्या हलगर्जी मुळे महिलेचे पर्स मधील सोने चोरी विभाग नियंत्रका कडे महिलेच्या पतीची तक्रार

किनवट (तालुका प्रतिनिधी) :
महागाव ते माहूर जाण्यासाठी पंढरपूर – माहूर बसने दि. ३१ मे रोजी प्रवास करणाऱ्या एका महिलेच्या पर्स मधील ४ तोळे सोन्याचे दागिने बस चालक व वाहक यांच्या आपसी संगणमताने त्यांच्या हालर गर्जीपणा मुळे अज्ञात व्यक्तीने दागिने लंपास केल्याची तक्रार महागाव पोलिस स्टेशन व विभाग नियंत्रक रा.प.म. विभाग कार्यालय नांदेड यांच्या कडे महिला जया ठाकरे व त्यांचे पती किरण ठाकरे यांनी केली आहे .
किनवट येथील पत्रकार किरण ठाकरे यांच्या पत्नी सौ.जया किरण ठाकरे माहेरी गेल्या होत्या. दि. ३१ मे २०२३ रोजी परत सासरी जाण्यासाठी महागाव बस स्थानकावरून सायंकाळी ५ वाजता पंढरपूर – माहूर बसने प्रवास करण्यासाठी बस मध्ये बसल्या बस कलगाव फाट्याच्या जवळ गेली असता तिकीट काढण्याकरिता त्यांनी पर्स बघितली तेंव्हा त्यांना पर्सची चैन खुली दिसली. पहातात तर काय त्यांच्या पर्स मध्ये ठेवलेले २ तोळ्याचे नेकलेस व २ तोळ्याचा पोहे हार ज्याची अंदाजे किमंत २लाख ४० हजार रुपये असलेले दागिने चोरीस गेल्याचे लक्षात येताच त्यांनी लगेच चालक व वहाक यांना पर्समधील दागिने चोरीस गेलाचे सांगून बस पोलिस स्टेशन ला घेण्याची विनंती केली. परंतू बस चालक शंकर खुडे व वहाक मोहाळे यांनी विनंती धुडकावत बस अंबोडा येथे थांबवू असे सांगितले. तेंव्हा प्रवासी महीला जया ठाकरे यांनी सर्व नातलगाना फोन करून सांगितले. तेंव्हा त्यांच्या नात लगानी महागाव पोलिस स्टेशनला फोन करून कळवले असता त्यांनी बस जिथे आहे तीथे थांबवा असे चालक व वाहकाला सांगितले तरी त्यांनी बस थांबवली नाही. महिलेच्या एका पाहुण्यांस ही घटना समजल्याने त्यांनी त्यांच्या अंबोडा येथील मित्रास बस थांबवण्यास सांगितले.त्यांनी सुद्धा अंबोडा येथे बस थांबवण्याची विनंती केली परंतू तीथे ही चालक व वहाक यांनी बस थांबवण्यास नकार दिला. आणी हिवरा बस स्थानकावर काही प्रवासी उतरवून दिले. महिला प्रवासी जया ठाकरे व त्यांच्या मुलीने व त्यांचा नातलगाने विनंती करून ही सहकार्य न केल्याने त्यांच्या हालरगर्जी पणा मुळे दागिने गेले. पोलिस स्टेशनला बस घेवून प्रवाशाची झडती घेतली असती तर माझे दागीने सापडले असते. चालक व वाहाकाने सहकार्य केले नाही म्हणून त्यांच्या विरुध तक्रार महागाव पोलिस स्टेशन व विभाग नियंत्रक रा.प.म. विभाग कार्यालय नांदेड यांच्या कडे सौ. जया ठाकरे व त्यांचे पती पत्रकार किरण ठाकरे यांनी केली आहे. यावेळी माहूर आगार प्रमुखांना निवेदन देताना मराठी पत्रकार संघाचे माहूर तालुका अध्यक्ष सरफराज दोसांनी, कार्तिक बेहेरे, दादाराव गायकवाड व मराठा सेवा संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष राजू शिंदे, किनवट येथील पत्रकार प्रमोद पहोरकर, प्रशांत वाठोरे, तथागत गायकवाड, सय्यद इमरान अली, कामराज माडपेल्लीवार आदी उपस्थित होते.

590 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.