नवोदयसाठी पात्र झालेल्या विरोचन कोवे याचा सत्कार
किनवट (प्रतिनिधी)
किनवट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक शिक्षक घनश्याम कोवे यांचा मुलगा विरोचन घनश्याम कोवे यांनी सन 2022-23 मध्ये घेण्यात आलेल्या नवोदय परीक्षेमध्ये उत्तुंग यश संपादन करत शंकर नगर नायगाव येथे नवोदय परीक्षेसाठी पात्र ठरलेला आहे. कोरोना काळात शाळा शिक्षण बंद असून सुद्धा मोबाईलचा योग्य असा वापर करून ऑनलाईन शिक्षणाच्या माध्यमातून इयत्ता तिसरी पासूनच स्पर्धा परीक्षेची आवड असणारा विरोचन आपल्या आई-वडिल तसेच काका प्राथमिक शिक्षक दत्ता कोवे मार्गदर्शनाखाली ओलंपियाड, स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा तसेच नवोदय परीक्षा या परीक्षेमध्ये यशस्वी अशी कामगिरी बजावली आहे. याचेच कौतुक अभिनंदन म्हणून किनवट तालुक्यातील साईनगर गोकुंदा परिसरातील शिक्षक व्यावसायिक तसेच प्रतिष्ठित ग्रामस्थांनी विरोचन घनश्याम कोवे यांच्या घरी जाऊन त्याचा फेटा,शाल,श्रीफळ व शालेय उपयोगी वस्तूभेट देऊन त्याच्या यशाबद्दल कौतुक अभिनंदन करून सत्कार करण्यात आले.
यावेळी प्राथमिक शिक्षक पांडुरंग खरोडे,मारोती भोसले,प्रशांत शेरे,अनमोल गायकवाड, रवी भालेराव,दत्ता कोवे,अनिल राठोड,जाधव सर, विमाप्रतिनिधी नारायण चांदनकर आदी साईनगर मधील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.