नांदेड येथे लोकस्वराज्य आंदोलनाची महत्वपूर्ण बैठकीचे आयोजन.
नांदेड प्रतिनिधी:-नांदेड येथील व्हीआयपी शासकीय विश्रामगृह येथे दिनांक- २९ जून२०२३ रोजी लोकस्वराज्यआंदोलन संस्थापक अध्यक्ष प्रा.रामचंद्रजी भरांडे यांच्या अध्यक्षते तथा मार्गदर्शनाखाली सामाजिक अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आंदोलनाची दिशा ठरवणे व संघटन बांधणीच्या अनुसंघाने लोकस्वराज्य आंदोलन संघटनेच्या महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यातआले आहे.या बैठकीला लोकस्वराज्य आंदोलन संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष व्हि.जी.डोईवाड, व लोकस्वराज आंदोलन महाराष्ट्र कामगार आघाडी अध्यक्ष रावसाहेबदादा पवार,बी.एम.गोणारकर व एडवोकेट दत्तराज गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
तरी नांदेड जिल्ह्यातील स्वाभिमानी समाज बांधवानी व लोकस्वराज्य आंदोलन पदाधिकाऱ्यांनी नांदेड येथील शासकीय विश्रामगृह येथे दुपारी १:००वाजता उपस्थित राहावे असे आवाहन लोकस्वराज्यआंदोलन युवक आघाडीचे मराठवाडा संघटक संतोष तेलंग,कामगार आघाडीचे मराठवाडा संघटक संजय खानजोडे हदगाव, सचिन वाघमारे,नागोराव कुडके,बाळासाहेब टिकेकर,माणिक कांबळे,धोंडोपंत बनसोडे,अंकुश गायकवाड,सुनील जाधव,संभाजीराजे वाघमारे,संदिप मेटकर,कैलास सुर्यवंशी,गंगाधर सिंदलोन,राजु गायकवाड,यादव कुडकेकर,आदी पदाधिकाऱ्यांच्या वतीने आवाहन केले आहे.