राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम जिवती येथील पथकाचे वैधकीय अधिकारी डॉ अंकुश गोतावळे व डॉ अर्चना तेलरांधे यांचे प्रयत्नातून योगेश सटवाजी मेटकर हृद्यशास्त्रक्रिया यशस्वी
जिवती/प्रतिनिधी: राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम जिवती येथील पथकाचे वैधकीय अधिकारी डॉ अंकुश गोतावळे तसेच डॉ अर्चना तेलरांधे यांचे प्रयत्नातून महाराजगुडा ता जिवती येथील रहिवाशी -योगेश सटवाजी मेटकर वय -12 वर्ष याची हृद्यशास्त्रक्रिया आचार्य विनोबा भावे हॉस्पिटल सावंगी वर्धा येथे यशस्वीपणे पूर्ण झालेली आहे .
सदर शस्त्रक्रिया शासकीय योजनेतून मोफत करून देण्यात आलेली आहे .राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम पथक जिवतीच्या वतीने आतापर्यंत एकूण 25 रुग्णांच्या हृद्यशास्त्रक्रिया पूर्ण करून बालकांना जीवदान दिले आहे तर आतापर्यंत विविध आजारांच्या एकूण 125 शस्त्रक्रिया करून जीवदान दिले आहे .
125 Views