किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

*आर्टीच्या प्रशिक्षणाचा लाभ घ्या;* *व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांचे आवाहन*

मुंबई, ता. 7 : मातंग समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक व राजकीय असा सर्वांगीण विकास करण्यासाठी अण्णा भाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्थेची (आर्टी) स्थापन करण्यात आली. या संस्थेची कंपनी कायदा 2013 च्या नियम 8 अन्वये नोंदणी पुर्ण झाली असून, मातंग आणि त्यातील तत्सम जातींच्या उन्नतीकरीता विविध कौशल्य प्रशिक्षण, स्पर्धा पुर्व प्रशिक्षण, योजना राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी मातंग समाजातील उमेदवारांनी आपल्या आवडीनुसार स्पर्धा परीक्षा, कौशल्य प्रशिक्षणाचे गुगल फार्म भरण्याचे आवाहन आर्टीचे व्यवस्थापकीय संचालक सुनिल वारे यांनी केले आहे.

उमेदवारांनी गुगल फार्म भरल्यानंतर त्यांनी निवडलेल्या कौशल्य प्रशिक्षणानुसार त्यांच्या अर्जाची छाननी करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. कौशल्य प्रशिक्षण पुर्ण करणाऱ्या उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. जे उमेदवार स्वंय रोजगार करण्यासाठी इच्छुक आहेत, त्यांना व्यवसायाकरीता आर्थिक मदतीसाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यासाठी ऑनलाईन गुगल फार्म भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. असे श्री. वारे यांनी सांगितले आहे.

*असे आहेत प्रशिक्षण कोर्सेस*
*स्पर्धा परीक्षा*: एमपीएससी, युपीएससी, बॅंक (आयबीपीएस), रेल्वे, जेईई- नीट, युजीसी- नेट/सेट, पोलीस/ मिलीटरी,
*कौशल्य विकास*: परदेशात नोकरी व शिक्षणाची संधी, शेतीपुरक व्यवसाय प्रशिक्षण, हार्डवेअर व सॉफ्टवेअर, तसेच कम्प्युटर सर्टिफिकेट संदर्भतील कोर्सेस.
*योजना*: पीएच. डी, पोस्ट पीएच.डी संशोधनासाठी अभिछात्रवृत्ती (फेलोशिप)

*असा अर्ज करावा:*
• इच्छुक उमेदवारांनी https://arti.org.in या आर्टीच्या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्डवर गुगल लिंक व स्कॅनर देण्यात आले आहे.
• उमेदवारांना गुगल लिंक जाऊन किंवा स्कॅन करुन संपुर्ण फार्म भरता येईल.

००००
स्वप्नील भालेराव,पीआरओ

656 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.