बहुप्रतिक्षित कोठारी येथिल नाल्यावरिल पुल निवडुन आल्यावर पहिल्या सहा महिण्यात तयार करु आश्वासन हवेत विरले?
किनवट ता.प्र दि ०२ किनवट तालुक्यातील बहुप्रतिक्षित कोठारी येथिल नाल्यावरिल पुल निवडुन आल्यावर पहिल्या सहा महिण्यात तयार करु असे आश्वासन तत्कालिन मुख्यमंत्री व आजी/माजी आमदार यांनी घोषणा करुन या भागातील नागरीकांना आश्वासीत केले होते.परंतु आध्यापही या कामाला मुहूर्त निघाला नाही.
आमदार केराम निवडुन येऊन सुमारे अडीच वर्षे झाली तरी कोठारी येथिल नाल्यावरिल पुलाच्या कामाचा विसर यांना पडला असुन या नाल्यावरिल पुलाच्या कामा संदर्भात चकार शब्द आमदार व भाजपा च्या नेत्याकडून काढण्यात येत नसल्याने नागरीकांच्या संयमाचा अंत पाहु नये असा घणाघाती आरोप राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांनी केला आहे.
तालुक्यातील मौजे कोठारी येथिल पुल हा शनिवारपेठ, दाभाडी, पार्डी, नागढव, येंदा पेंदा, कोपरा, भुलजा, बोधडी सह सुमारे ४० गावांकरिता अत्यंत आवश्यक असुन या गावाचा संपर्क पावसाळ्यात तुटत असुन सद्य स्थितीत असलेले पुल हे अत्यंत धोकादायक बनले आहे. येथे दररोज लहानमोठे अपघात होत आहेत तर शेतक-यांचे ट्रक्टर, शेतमालाची वाहने, दुग्धउत्पादक शेतक-यांची वाहने, रेतीची वाहतुक करणारी वाहणे, याभागात मोठ्या प्रमाणात असलेल्या विट भट्ट्याच्या वाहनांचा दररोज अपघात होत आहेत. तर यामुळे काहि वाहने पुलात कोसळत आहे. तर येथिल सत्ताधारी हे कोणती अप्रिय घटणा घटीत व्हावी याची वाट पाहत आहे का ? असा सवाल हि तालुका अध्यक्ष प्रकाश राठोड यांनी केला आहे.