शासकिय कार्यालय शाळा,महाविद्यालय मंदिर ठिकाणीं दारु पिऊन फोडल्या बाटल्या
जळकोट प्रतिनिधी:गोपाळ केसाळे
जळकोट तालुक्यातील मौजे वांजरवाङा युवा तरून विद्यार्थि झाला जागा लवकर अवैध्य धंद्ये बंद करा ,दारु बंद झालीच पाहिजे ,जाहिर निषेध जाहिर निषेध आशा घोशना देत ,हालकि वाजवत ग्रामपंचायतीव मोर्चा काढून ग्राम विकास आधिकार्याना ऐक लेखी निवेदन दिले ,वाजरवाडा या गावात अवैध दारू विक्री मोठ्या प्रमाणात होत असून, गावातच दारू मिळत असल्यामुळे दारू पिणा-यांची संख्याही अधिक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे गावातील विविध शासकीय कार्यालय, शाळा, महाविद्यालय, मंदिर आदि ठिकाणी दारू पिऊन दारूच्या बाटल्या फोङल्या जातात, त्यामुळे त्यांचा त्रास शाळकरी लहान मुले, महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थीनी व गावातील महिलांना होत आहे.
वांजरवाङा येथील ४०० ते ५०० महिला, पुरुष, तरूणांनी आज दि, ३१-०१-२०२२ रोजी वांजरवाङा येथील ग्रामविकास अधिकारी किशोर सर्कलवाङ,यांना निवेदन देऊन,गावातील होत असलेली अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी असे निवेदन देण्यात आले.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वांजरवाङा ता. जळकोट जि. लातूर हे गाव धार्मिक तिर्थ क्षेत्र आहे. गावातील गोविंद माऊली मंदिर हे प्रती पंढरपूर म्हणून मानले जाते. त्यामुळे गावात मोठ्या प्रमाणात भाविक भक्त बाहेरून तसेच लांबून मोठ्या संख्येने येत असतात, तरी गावातील नागरिक राजकीय आधार घेऊन मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री करत आहेत. त्यामुळे गावातील सामान्य जनतेला यांचा खुप मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. तसेच दारू पिऊन मारामारी व इतर प्रकारचे गुन्हे घङत असल्याने गावातील सामान्य जनतेला विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. भविष्यात दारू पिणा-या लोकांमुळे गावात गंभीर स्वरूपाचा गुन्हा अथवा गंभीर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. गावातील नागरिक खुप वैतागले असून, सामान्य जनतेकङून पण उठाव होण्याची दाट शक्यता आहे. वांजरवाङा गावात अवैध दारू विक्री होण्यास पोलीस प्रशासनाचा पाठिंबा असल्याने अवैध दारू विक्री करणारे सामान्य जनतेला वेठीस धरत आहेत.
तरी ग्रामविकास अधिकारी साहेबांनी वांजरवाङा येथील अवैध दारू विक्री बंद करण्यात यावी यासाठी ग्रामविकास अधिकारी यांना निवेदन देऊन ठराव एकमतानी मंजूर करण्यात आला. तसेच राज्य उत्पादन शुल्क लातूर, पोलीस अधिक्षक, लातूर, पोलीस निरीक्षक जळकोट यांना महितीस्तव देण्यात आले आहे.