वनजमिनीचे दावे (पट्टे ) शासनातर्फे नामंजूर करण्यात आले अशा विरोधात बोधडी वनविभागातर्फे दिग्रस मध्येआज धडक कारवाई
किनवट (प्रतिनिधी ) -बोधडी येथील शासनातर्फे ज्या लोकांचे वनहक्काचे दावे नामंजूर करण्यात आले अशा लोकांनी वनजमिनीवरील ताबा अद्यापही सोडला नव्हता अशा विरोधात बोधडी वनविभागातर्फे दिग्रस मध्येआज धडक कारवाई करण्यात आली आहे .यावेळी वन विभागाचा मोठा ताफा घटनास्थळी होता .
याबाबत सविस्तर वृत्त असे की शासनाने वन जमिनी पट्ट्याची योजना आणली होती . या योजनेत शासनाने नियमावलीनुसार सर्व बाबींची तपासणी करून ज्यांनी सर्व कागदपत्रांची पूर्तता केली अशांनाच पट्टे वाटप केले होते . पण ज्यांचे वनजमिनीचे दावे (पट्टे ) शासनातर्फे नामंजूर करण्यात आले अशा लोकांनी वन जमिनीवर अद्यापपर्यंत अवैधपणे ताबा करून ठेवला होता . या विरोधात नांदेडचे उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व च वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना धडक कारवाई करण्याचे आदेश दिले होते . त्यांच्या आदेशाची अंमलबजावणी करत बोधडी वन विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीकांत जाधव यांनी सहा . वनसंरक्षक श्रीनिवास लखमावाढ रोहयो व वन्यजीव नांदेड यांच्या मार्गदर्शनाखाली , आज दिग्रस येथील वन सर्वे नंबर 19 कक्ष क्रमांक 243 मध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी आपल्या फौजफाट्यासह सकाळी दहा वाजता पोहचून या क्षेत्रातील अतिक्रमण जेसीबी च्या सहाय्याने पूर्णपणे काडून वन जमीन अतिक्रमण मुक्त केले . वन विभागाच्या या धडक कारवाईमुळे वन जमिनीवर अवैधपणे कब्जा करणार्यांचे धाबे दणाणले आहे .
वन विभागाची ही कारवाई या एकाच गावा पुरता मर्यादित न राहता संपूर्ण परिसरात राबविण्यात यावी अशी वन प्रेमी नागरिकांकडून मागणी होत आहे . वन विभागाच्या या कारवाईमध्ये वनपाल सोनकांबळे ,के एम बार्लेवाड , एस के कुमरे ,एस एल ढगे, वाय जी शेख, पठाण , कृष्णा माली, वनरक्षक तोटावाढ , कोरडे,वनवे , देवकांबळे, काळे , भुरके,पंधरे , डाहळके आधी वनरक्षक व मजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते .