कॉ.यादवराव गोविंदराव गायकवाड यांचे दुःखद निधन
*अखेरचा लाल सलाम !*
दिनांक २२ जुलै रोजी रात्री ११:३० वाजता एमजीएम कॉलेज समोरील बजरंग कॉलनी येथील राहिवासी कॉ.यादवराव गायकवाड यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले. त्यांचे वय १०५ वर्षे होते.
त्यांच्या पशच्यात पाच मुली आणि एक मुलगा असून नातू पंतू असा परिवार आहे.
ते मुळचे ढाणकी ता.उमरखेड जिल्हा यवतमाळ येथील असून नंतर ते वझरा (शेख फरीद) ता. माहूर जिल्हा नांदेड येथे स्थायिक झाले होते आणि सद्यस्थितीत ते नांदेड येथील राहिवासी होते.
अत्यन्त धाडसी आणि स्वाभिमानी व्यक्तीमत्व म्हणून त्यांची ओळख आहे.
सावंत्र्यपूर्व काळापासून शेवटच्या श्वासासापर्यंत ते लाल बावट्याचे खंदे समर्थक आणि एकनिष्ठ कार्यकर्ते होते.
सुरवातीला शेतकरी कामगार पक्ष नंतर भारतीय काम्युनिस्ट पक्ष आणि शेवटी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष असा त्यांचा जीवनप्रवास राहिला आहे.
त्यांच्या पक्ष निष्ठेमुळे आणि वैचारिक चर्चेतून त्यांच्या घरातील आजघडीला १५ जन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सदस्य आहेत आणि त्यांच्या कुटुंबातील साधारणता २० ते २५ व्यक्ती पक्षाचे हितचिंतक आहेत.
त्यांच्या कुटूंबियांनी नांदेड मध्ये अनेक यशस्वी आंदोलने केल्याची नोंद आहे.
कॉ.यादवराव गायकवाड यांचे पुत्र कॉ.गंगाधर गायकवाड हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य तथा नांदेड शहर कमिटीचे सचिव आहेत तसेच सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन (CITU) राज्य कमिटीचे सदस्य आणि नांदेड जिल्ह्याचे जनरल सेक्रेटरी आहेत.त्यांच्या सुनबाई अ.भा. जानवादी महिला संघटनेच्या नांदेड तालुका अध्यक्ष आहेत. तर पुतणी अ.भा.जनवादी महिला संघटनेची नांदेड जिल्हा निमंत्रक आणि सिटू संलग्न घरकामगार संघटनेची कार्याध्यक्ष आहे. नातू कॉ. जयराज करण गायकवाड हा डीवायएफआय युवा संघटनेचा नांदेड शहर निमंत्रक आहे. त्यांची मुलगी सन २००५ पासून पक्ष सभासद असून अ. भा.जनवादी महिला संघटना व सिटू संलग्न असंघटित कामगार संघटनेची पदाधिकारी आहे.
त्यांचे नातू SFI आणि DYFI संघटनेत सक्रिय आहेत.त्यांची
नातवंडे,सुना,मुली,पुतणे असे बहुसंख्य जन आज पक्षाचे सभासद व हितचिंतक आहेत.
मार्क्सवादावर प्रचंड निष्ठा असलेला आणि क्रांतिकारी भविष्य मांडणारा कम्युनिस्ट योद्धा आज आम्हाला सोडून गेला त्यांच्या स्मृतिस क्रांतिकारी अभिवादन !
कॉम्रेड यादवराव गायकवाड अमर रहें !
अखेरचा लाल सलाम !!
टीप : कॉ.यादवराव गोविंदराव गायकवाड यांची अंत्ययात्रा नांदेड येथील माकप कार्यालय एमजीम कॉलेज समोरील प्रियदर्शीनी शाळा येथून दिनांक २३/०७/२०२२ रोजी दुपारी १:०० वाजता निघणार असून अंत्यविधी गोवर्धन घाट नांदेड येथे होणार आहे.
*कॉ.जयराज गायकवाड*
*(नातू )*
डीवायएफआय,.नांदेड.
मो.7448158032