डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखीत संविधानाने प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या त्यांच्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे तसेच धार्मिक प्रबोधन करण्याचे स्वातंत्र्य दिले -राजेंद्र शेळके
आशिष शेळके / किनवट : उत्तर प्रदेश मधील भारतीय जनता पार्टीच्या योगी आदित्यनाथ सरकारने राजकीय सुडबुद्दीने एटीएस मार्फत मौलाना कलीमोद्दीन सिद्दीकी साहेब यांच्यावर खोटेनाटे आरोप करुन त्यांच्यावर गुन्हा दाखल केल्याचा आरोप करत मुस्लिम व बौद्ध बांधवांनी दि. १ नोव्हेंबर रोजी शुक्रवारी किनवट सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयावर निषेध मुक मोर्चा काढला. हे खोटे गुन्हे तात्काळ रद्द करुन मौलाना सिद्दीकी यांची सुटका करावी अशी मागणी आंदोलकांनी केली. तालुक्यातील मुस्लिम व बौद्ध बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन सहाय्यक जिल्हाधिकारी यांच्या मार्फत संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
मुस्लिम व बौद्ध बांधवांनी निवेदन दिल्यानंतर सहाय्यक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काही वेळ धरना दिला. पत्रकारांशी संवाद साधताना वंचित बहुजन आघाडीचे राजेंद्र शेळके म्हणाले की, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर लिखीत संविधानाने प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या त्यांच्या धर्माचा प्रचार व प्रसार करण्याचे तसेच धार्मिक प्रबोधन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे असे असताना देखील योगी सरकारने खोटेनाटे आरोप करुन सूडबुद्धीने सिद्दीकी साहेबांना अटक करुन कायद्याचा गैरवापर केला आहे. जर मौलाना सिद्दीकी यांनी कुठल्याही व्यक्तीचे जबरदस्तीने धर्मपरिवर्तन केले असेल तर एक पुरावा दाखवा आम्ही याच ठीकाणी मौलाना सिद्दीकी यांचा विरोध करु पण कुठलाही पुरावा नसताना अस जबरदस्तीने अटक करणे म्हणजेच तानाशाही होय. जोपर्यंत सिद्दीकी साहेबांना सुटका केली जात नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी मौलाना सिद्दीकी साहेबांसोबत आहे असे बोलून राजेंद्र शेळके यांनी इंकलाब जिंदाबाद व आझादी आझादी चे नारे दिले.
त्यानंतर मौलाना मुफ्ती फेरोज यांनी सांगितले की, मुस्लिम समाज हा देशाच्या प्रत्येक संकटाच्या वेळी धाऊन आला आहे व मुस्लिम समाज पण देशासाठी शहीद झाला आहे. आम्ही बाय चाॅईस नी या देशात नाही आलोत तर माय चाॅईस नी या देशात आलो आहे कारण आमच्या पुर्वजांनी या देशात राहने पसंद केले आणि आम्ही ही देशात राहने पसंद करतो म्हणून आमच्या वर कितीही खोटे आरोप लावले किंवा आम्हाला घाबरविले तरी आम्ही घाबरणार नाही कारण बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान आमचे संरक्षण करण्यासाठी आहे.
मुक मोर्चा व धरने मध्ये राजेंद्र शेळके, शेख अजमल, राहुल कदम, गब्बर काजी, इम्रान खान, फहीम कुरेशी, फेरोज पठाण, मौलाना मुक्ती फेरोज, सैफ मौलाना, मो. रफीक, सोनु, शेख वहिद, फैयाज चौहान, सरदार काजी, मझहर चाऊस, शोहब, शकील, अरशद खान, शेख वास्सी, शहबाज शेख शहाब, जावेद, अजिस, सय्यद नदीम, जुनेद, जमीर या़ंच्यासह असंख्य युवक उपस्थित होते.