किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

“रोजगार सेवक” यांच्या मागण्यासाठी किनवट पंचायत समिती कार्यालय येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण संपन्न.

किनवट प्रतिनिधी:

महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायत ग्रामरोजगार सेवकांना शासकीय सेवेत
कायमस्वरूपी करण्यासाठी महात्मा गांधी यांच्या जयंती दिना निमित्त महाराष्ट्रातील सर्व पंचायत समिती कार्यालय व तहसील कार्यालय येथे एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले आहे.

ज्या महाराष्ट्र राज्यात ग्रामीण रोजगार हमी योजनेचा जन्म झाला. त्याच महाराष्ट्रातील रोजगार सेवक हा गेली चौदा पंधरा वर्षे झाले शासनाच्या अनेक विविध योजना वैयक्तिक असो किंवा सार्वजनिक असो,
योग्य रित्या शेतकरी व मजूर कुटुंबात पोहचविण्याचे काम तो आजपर्यंत ईमानदार पणे करतोय.
पण ज्या शेतकऱ्यांना मजूरांना सुखाचे दिवस आणण्यासाठी तो रात्रंदिवस मेहनत घेतो,त्याच महाराष्ट्रातील रोजगार सेवकांनवर उपासमारीची वेळ ह्या मायबाप सरकारने आणली आहे.त्यांच्या मुलाबाळाचा विचार आजपर्यंत कोणत्याही सरकारणे केला नाही.
राज्यामध्ये सन २००६ पासून आजपर्यंत राज्यातील सर्व ग्रामरोजगार सेवक हे शासनाच्या प्रशासकीय खर्चाच्या ४%६% अशा तोडक्या मानधनावर काम करत आहेत.ते पण, मानधन सहा सहा महिने वेळेवर मिळत नाही.त्यात ग्रामपंचायत खात्यामध्ये मानधन जमा होते, रोजगार सेवक यांना स्वताच्या मैहनतिचे पैसे मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. हिच मोठी शोकांतिका रोजगार सेवकांच्या वाटल्या आली आहे.
ग्रामपंचायत मध्ये नविन सरपंच उपसरपंच निवड झाल्यानंतर मागील राग मनात ठेवून सुड बुद्धीने ग्रामरोजगार सेवक यांना खोट्या प्रोसिडींग द्वारे कामातुन कमी करून मानसिक त्रास देणे.अशा प्रकारास बर्याच जणांना सामोरे जावे लागते.
भविष्यात अशी वेळ येऊ नये,यासाठी महाराष्ट्रातील28144 ग्राम रोजगार सेवक यांच्या एक जुटीने एक दिवसीय लाक्षणिक उपोषण विविध मागण्या संदर्भात ठेवण्यात आले. निवेदनाचा सहानुभूती पुर्वक विचार सरकारने करावा, अन्यथा पुढच्या वेळी उग्र स्वरूपाचे आंदोलन महाराष्ट्रभर करण्यात येणार असल्याचे,किनवट तालुका ग्रामरोजगार सेवक संघटनेचे अध्यक्ष मा.गेमसिग जाधव यांनी सांगितले.या वेळी उपोषणाला बसलेल्यां मध्ये मधुकर गवले बापूराव वावळे राहुल पाटील ज्ञानेश्वर मुंडे पुंडलिक घुगे नामदेव सावरकर अरूण राठोड मनोज केंद्रे बालाजी राठोड किरण राठोड संजय राठोड राम जाधव साहेबराव दार्लावार अशोक जाधव संजय मिराशे कृष्णा आत्राम संदिप सलाम सचिन राठोड तालुक्यातील ग्राम रोजगार सेवक मोठ्या संख्येने उपोषणाला उपस्थितीत होते.

138 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.