किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा किनवट टुडे न्यूज नेटवर्क,संपादक:आनंद भालेराव 9421585350.ताज्या अपडेटसाठी KTN महाराष्ट्र न्युज सबस्क्राईब करा

प्रा. नितेश कराळे यांच्या मारेगाव येथील कार्यक्रमाला प्रचंड गर्दी* *प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि मारेगाव कॉलेजच्या वतीने केले होते आयोजन

मारेगाव, यवतमाळ : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघांचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांच्या प्रेरणेतून तालुका मारेगाव येथील प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ आणि मराठी विभाग कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने दि.२५ डिसेंबर २०२२रोजी खद खद मास्तर प्रा. नितेश कराळे यांचे विध्यार्थ्यांना मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी मंचावर या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्रा. नितेश कराळे सर होते. तर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. अविनाश घरडे होते. कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष म्हणून रंगनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष देविदास काळे, डॉ. महेंद्र लोढा होते. प्रमुख अतिथी म्हणून केशवजी सवळकर (विदर्भ प्रदेश अध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ महा. राज्य ) अनिलभाऊ राठोड (जिल्हाध्यक्ष प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, महा. राज्य ) शिक्षण संस्थेचे अध्यक्ष जीवन कापसे, सामाजिक कार्यकर्ते विजय बोथले, अविनाश लांबट, ठाणेदार राजेश पुरी यांची मंचावर उपस्थिती होती.

या कार्यक्रमांची सुरुवात मंचावरील मान्यवरांच्या हस्ते संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन करून, पुष्प हार अर्पित करून व दीप प्रज्वलीत करून करण्यात आले.कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा. नितेश कराळे यांचे स्वागत प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या सर्व पत्रकारांच्या हस्ते पुष्प व हार घालून करण्यात आले. तर मराठी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या वतीने प्रा. नितेश कराळे यांचा सत्कार प्राचार्य डॉ. अविनाश घरडे यांच्या हस्ते शाल व पुष्प गुच्छ देऊन करण्यात आला. मंचावरील सर्व मान्यवरांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

सर्वांचे लोकप्रिय खद खद मास्तर म्हणून ओळख असणारे प्रा. नितेश कराळे आपले मार्गदर्शन करण्यासाठी माईक जवळ उभे होताच उपस्थित सर्वानी टाळ्याच्या गजरात उत्साहित होऊन सरांचे स्वागत केले. उपस्थित लोकांची गर्दी पाहून लोकांचे प्रेम पाहून मनातील आनंद लपवू शकले नाहीत. हास्याचे फवारे उडवीत त्यांनी आपल्या अस्सल वऱ्हाडी भाषेतून उपस्थित हजारो विध्यार्थी तथा जनसंमुदायास वर्तमान परिस्थिच्या वेगवेगळ्या पैलूवर भाष्य करीत गंभीरतेने व विनोदाने उपस्थिताचे मने जिंकली. विध्यार्थी दसेपासून उच्चंपदस्त समाजपयोगी माणूस घडविण्यासाठी नियमित अभ्यासाची जोड प्रतिपादन करीत प्रा. नितेश कराळे यांनी वाढत्या महागाईचा आलेख, बेरोजगारी, भरकटत असलेला विध्यार्थी, शेतकरी आत्महत्या या गंभीर बाबीवर चिंता व्यक्त करीत कार्यक्रमात विनोदाचे फवारे उडवीत अभ्यासक्रम, मुळाक्षरे, व्यंजने आदिवर अभ्यासपूर्ण विवेचन करीत विध्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेत. विध्यार्थ्यांच्या मनातील खद खद दुर करीत आपल्या आगळ्यावेगळ्या शैलीची चुणूक दाखवीत उपस्थिताच्या मनावर भुरळ पाडली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. राजेश चवरे यांनी केले तर प्रास्ताविक प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे पत्रकार रोहन आदेवार यांनी केले. व प्रा. गजानन सोडणर यांनी आभार मानले. कार्यक्रमांची सांगता होताच प्रा. कराळे सर विध्यार्थ्यांमध्ये कैद झाले.
महाराष्ट्रातील जनतेच्या मनात भुरळ पाडणारे खद खद मास्तर प्रा. नितेश कराळे यांची एन्ट्री मारेगावात पर्वणी ठरली. कार्यक्रमांची सांगता होताच विध्यार्थ्यांनी प्रा. कराळे यांचे सोबत फोटोसेशन साठी गराडा घातला. शेकडो विध्यार्थी, नागरिक व प्राध्यापकांनी आपल्या मोबाईल मध्ये खद खद मास्तरला कैद केलेत. या वेळी फोटोसेशन साठी चांगलीच झुंबळ उडाली होती.

150 Views
बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
किनवट टुडे न्यूज नेटवर्क,परिसरातील घडामोडीवर एक नजर,"महाबातमी-महाचॅनेल"-संपादक:आनंद भालेराव 9421585350. ताज्या अपडेट साठी KTN महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.