पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी जाणून घेतल्या शेतकऱ्यांच्या व्यथा!
नांदेड जिल्हा प्रतिनिधी:संजीवकुमार गायकवाड
नांदेड:दि.2.नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज धर्माबाद तालुक्याचा दौरा करून शेतकऱ्याच्या अगदी सहानुभूतीने व्यथा जाणून घेतल्या.
या महिनाभरात दोन वेळेस मुसळधार पाऊस झाला. जायकवाडी, विष्णुपुरी, बळेगाव, आमदुरा आदी सर्व धरणांचे पाणी दारे उघडून गोदावरी नदीत सोडण्यात आले. त्यामुळे गोदावरी नदीला महापूर आला होता. तद्वतच पोचमपाड या तेलंगणातील मोठ्या धरणाच्या बॅक वॉटर मुळे गोदाकाठची जवळपास सर्व शेती पाण्याखाली गेली होती. व सर्व खरीप पिके मातीमोल झाली. अनेक रस्ते उखडले. त्या अनुषंगाने शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी पालकमंत्री तथा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांनी आज जिल्यातील धर्माबाद तालुक्यातील जारिकोट, दिग्रस,चोंडी,उमरी तालुक्यातील बेलदारा,बळेगाव,मुदखेड तालुक्यातील पिंपळगाव,आदी जास्त क्षतिग्रस्त गावांना भेटी देत अतिशय मौन बाळगत विदारक दृश्य बघत होते.प्रत्येक गावातील गावकऱ्यांनी झालेल्या नुकसान भरपाईच्या संदर्भात पालकमंत्र्यांना निवेदन दिले. यावेळी पालकमंत्री अशोकराव चव्हाण हे कुठलीही घोषणा न करता निघून गेले असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर झालेल्या नुकसानीचे विदारक चित्र व शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील केविलवाणा भाव सुटला नाही. बहुदा दौरा संपल्यावर ते मोठी घोषणा करतील असे संकेत मिळत आहेत.
पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या समवेत माजी आमदार वसंतराव चव्हाण,प्रसिद्ध उद्योजक मारोतराव कवळे गुरुजी पाटील,माजी उपमहापौर आनंद पाटील चव्हाण,काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दत्ताहरी पाटील चोळाखेकर,बालाजी पाटील कारेगावकर,उमरी तालुक्यातील सिंदीकर,जिल्हा सरचिटणीस तथा अशोकराव चव्हाण यांचे अतिशय विश्वस्त व वर्णी नागभूषण नांदेड जिल्हा परिषदेचे अध्यक्षा मंगाराणी अंबुलगेकर,धर्माबाद नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दिगंबर लखमावाड,नगरसेवक निलेश पाटील बाळापूरकर, प्राध्यापक रवींद्र मुपडे.महाराष्ट्र सामाजिक सुरक्षा समितीचे नांदेड जिल्हाध्यक्ष संजीवकुमार गायकवाड,माधव पाटील चोंडीकर नरेंद्र रेड्डी,मारोती डेबेकर,संदीप डूमणे,सुरेकांत जुनिकर,अवधूत पाटील oसालेगावकर,वेंकट पाटील बाभुळगावकर,गावचे प्रमुख प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्व गोविंद रामोड यांच्यासह काँग्रेस पक्षाचे व विविध पक्ष संघटनेचे असंख्य पदाधिकारी,कार्यकर्ते व प्रसार माध्यमाचे बहुतांशी प्रतिनिधी उपस्थित होते.