प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या वतीने पत्रकारांची एकदिवसीय कार्यशाळा व स्नेहमेळावा संपन्न* विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान
अकलूज (सोलापूर) : प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ, सोलापूर जिल्हा यांचे वतीने पत्रकारांचा स्नेहमेळावा व एक दिवसीय कार्यशाळा नुकतीच घेण्यात आली. या कार्यशाळेचा शुभारंभ अद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर व सहकार महर्षी शंकरराव मोहिते आणि अक्कासाहेब रत्नप्रभादेवी मोहिते यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आला. यावेळी ‘भाषिक व्यवहार आणि पत्रकारिता’ या विषयावर अरविंद जोशी यांचे व्याख्यान तर द्वितीय सत्रात प्रेस संपादक व पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष डी. टी. आंबेगावे यांचे ‘पत्रकारितेची आचारसंहिता’ या विषयावर व्याख्यान झाले. या व्याख्यानात आंबेगावे यांनी पत्रकारांची नैतिक जबाबदारी, मर्यादा व कायदे आणि त्या अनुषंगाने पत्रकारांनी घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर माहिती देत संघातील सदस्यांना जर कोणी जाणून बुजून त्रास देत असेल तर त्यांना त्याच भाषेत उत्तर देऊ परंतु प्रत्येक सदस्यांचे हित जपू असे आश्वासनही दिले. तर पत्रकार अरविंद जोशी यांनी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेले अनेक शब्द जनमानसात रूढ होत असतात त्यामुळे पत्रकारांनी प्रत्येक शब्द वापरताना सामाजिक जबाबदारीचे भान ठेवणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त केले.
यावेळी प्रेस संपादक व सेवा संघाच्या वतीने विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा उत्कृष्ट सेवा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला यामध्ये प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे लातूर जिल्हाध्यक्ष लहुकुमार शिंदे यांना उत्कृष्ट संपादक पुरस्कार, लातूर जिल्हा महिला अध्यक्षा वैशालीताई पाटील यांना उत्कृष्ट महिला पत्रकार पुरस्कार, बापू सावता एकतपुरे यांना समाज सेवक, डॉ. विनायक भीमराव फुले यांना उत्कृष्ट सेवा, सोपान महादेव मोरे यांना उत्कृष्ट गायक, रेणुका बँक शाखा अकलूज यांना उत्कृष्ट सेवा आदी मान्यवरांना सन्मानित करण्यात आले. तसेच सुदर्शन खंदारे यांची सोलापूर जिल्हा कार्याध्यक्षपदी निवड जाहीर करण्यात आली.
याप्रसंगी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे माढा तालुका अध्यक्ष कुंदन वजाळे, उपाध्यक्ष नाथा सावंत, करमाळा तालुका सचिव अक्षय वरकड, सहसचिव हर्षवर्धन गाडे, सांगोला तालुका अध्यक्ष प्रवीण सावंत, सातारा जिल्हाध्यक्ष पंकज धायगुडे-पाटील, संपादक भाग्यवंत नायकूडे, नानासाहेब नाईकनवरे, रजनी साळवे, दादा साळवे, अतुल मदने, मयूर भोरे, सागर वाघमारे, दत्तात्रय वाघमारे, निकम वाघमारे, दिनेश बंडगर, विश्वजीत जाधव, दत्तात्रय नाईकनवरे, संतोष अडगळे, रवी ढोबळे, इस्माईल पठाण, सुनील चेळेकर यांचेसह सोलापूर, लातूर सातारा, पुणे जिल्ह्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी कार्यक्रमाचे संयोजक जिल्हाध्यक्ष सोमनाथ खंडागळे, शशिकांत कडबाने, नौशाद मुलानी व गणेश जाधव यांनी परिश्रम घेतले.