नांदेड लोकसभेचे जिल्ह्याचे पहिले खासदार मा.देवराव कांबळे साहेब यांचा पुतळा नांदेड शहरात बसवण्यात यावा-शंकर भंडारे
नांदेड/प्रतिनिधी: सन 1952 ते 1957 च्या काळात नांदेड लोकसभेचे जिल्ह्याचे पहिले खासदार मा.देवराव कांबळे साहेब यांचा पुतळा नांदेड शहरात बसवण्यात यावा अशी मागणी शंकर बाळू भंडारे राहणार गांधीनगर नांदेड यांनी मा. जिल्हाधिकारी नांदेड यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात विनंती करण्यात आली आहे की, नांदेड जिल्ह्याचे पहिले खासदार मा.देवराव कांबळे यांचा नांदेड शहरात भव्य पुतळा उभारण्यात यावा कारण नांदेड शहराची शान यामुळे नक्कीच वाढेल.मा. देवराव कांबळे हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचे विश्वासू सहकारी होते. त्यामुळे महानगरपालिका व जिल्हा परिषदेच्या सभागृहात देवराव कांबळे यांचे तैलचित्र लावण्यात आले यावे अशी मागणी ही त्यांनी केली आहे. यामुळे नांदेड जिल्ह्यातील सर्व जनतेला आपले पहिले खासदार कोण होते यांची ओळख स्मरणात राहील आणि हे काम हे काम आपण नक्कीच कराल अशी विनंतीही शंकर भंडारे यांनी निवेदनात केली आहे.