आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाच्या बोधडी बुद्रुक गटात जोरदार हालचाली सुरू ; युवानेते सुभाषबाबू नायक राठोड यांच्या प्रयत्नातून या भागातील अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश
किनवट प्रतिनिधी आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने बोधडी बुद्रुक गटात जोरदार हालचाली सुरू केल्या असून युवानेते सुभाषबाबू नायक राठोड यांच्या प्रयत्नातून या भागातील अनेक कार्यकर्ते काँग्रेसमध्ये प्रवेश करू लागले आहेत दरम्यान 29 मे रोजी नांदेड येथे आयोजित केलेल्या काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकी दरम्यान चिखली बु व मलकवाडी येथील अनेक युवा कार्यकर्त्यांनी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला असून त्यांच्या प्रवेशामुळे या भागात काँग्रेसला बळकटी प्राप्त होणार असल्याचे बोलले जात आहे
काँग्रेसचे युवानेते सुभाषबाबू नायक राठोड यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर बोधडी बु गटातील वाडी तांड्यात व खेड्यापाड्यात जाऊन पक्ष बांधणीचे काम हाती घेतले आहे त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या भागातील वेगवेगळ्या पक्षातील तरुण कार्यकर्त्यांनी काँग्रेसमध्ये येण्याचा धडाका सुरू केला आहे काँग्रेस नेत्यांच्या गावभेटी, मेळावे, बैठकां पाहता या भागात काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस मजबूत होत असल्यामुळे विरोधक धास्तावले आहेत दरम्यान युवानेते सुभाषबाबु नाईक राठोड यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून चिखली बु व मलकवाडी येथील युवा कार्यकर्ते संतोष अडकीने, शेख इशरत, बापूसाहेब भगत पाटील, दानिश शेख, शेख जावेद यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह 29 मे रोजी नांदेड येथे आयोजित केलेल्या काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीदरम्यान पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे भक्ती लॉन्स येथे हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला असून वेगवेगळ्या समाजातील तरुण कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे आगामी निवडणुकांत काँग्रेसला मोठा फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे याप्रसंगी माजी आ डी पी सावंत, अमर राजूरकर, जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर, मा खासदार भास्करराव पाटील खतगावकर,किनवट तालुका अध्यक्ष सूर्यकांत रेड्डी, व्यंकटराव नेमानिवार, के मूर्ती, नारायण सिडाम युवानेते सुभाषबाबु नायक राठोड, ईश्वर चव्हाण, प्रकाश गेडाम,गिरीश नेमानीवार, जवाद आलम, वसंत राठोड, सय्यद अन्वर,फकृद्दिन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते