नांदेड जिल्ह्यातील कोतवालांची हेळसांड . महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना शाखा किनवट /माहुरच्या वतीने राज्याचे महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व आ.भिमराव केराम यांना निवेदन
किनवट ता. प्र दि २८ राज्य शासनाच्या महसुल विभाग व ग्रामिण भागातील नागरीक यांच्या मधिल नाळ म्हणजे कोतवाल, जो २४ तास शासनाला उपलब्ध असतो. परंतु किनवट तालुक्यातील कोतवालांना राज्यातील इतर जिल्ह्याप्रमाणे मानधन मिळत नसल्याने नांदेड जिल्ह्यातील कोतवालांची हेळसांड होत असल्याचे नुकतेच महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटना शाखा किनवट माहुरच्या वतीने राज्याचे महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व आ.भिमराव केराम यांना देण्यात आलेल्या निवेदनावरुन निदर्शनास येत आहे.
शासनाच्या एका निर्णयाअन्वये ज्या कोतवालांची सेवा ५ वर्षे व त्यापेक्षा जास्त असेल अशा कोतवालांना सरसकट किमान १५००० रुपये पर्यंत मानधनात वाढ करण्यात आलेली आहे या नुसार राज्यातील इतर जिल्ह्यातील कोतवालांना मानधन अदा देखिल करण्यात येत आहे. परंतु नांदेड जिल्हा व मुख्यत्वे किनवट व माहुर तालुक्यातील कोतवालांना ठरावीक कालावधीची सेवा होऊन देखिल तुटपुंजे माधनद देण्यात येत असल्याने किनवट माहुर तालुक्यातील कोतवालांनी राज्याचे महसुल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील व आ. भिमराव केराम यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे कि, राज्य शासनाकडे पाठपुरावा करुन सदरचे मानधन मिळवुन द्यावे.
महसुल विभागाचे उत्पन्न वाढवण्यामध्ये कोतवाल हे महत्वाची भुमिका बजावतात त्यामुळे शासनाच्या तिजोरी मध्ये मोठ्या प्रमाणात रोख रक्कम जमा होते. परंतु कोतवालांची तुटपुंज्या मानधनावर हेळसांड शासना कडुन होत असल्याचे या वरुन निदर्शानत येत असल्याने कोतवाल संघटनानी निवेदनाव्दारे आपली मागणी मांडली आहे.
कोतवाल संघटना शाखा किनवट च्या वतीने सादर केलेल्या निवेदनावर अमोल सुर्यवंशी, अयोध्या जटाळे, वैशाली धुर्वे, वानोळे राजु भगवान, रंजना उत्तम पोटे, श्रीराम हुसेन तुमराम, राजेंद्र कोंडबा शेळके, भुरके त्रिमला पांडुरंग, कल्पना विठ्ठलराव वाळके, हनमंतु दडांजे यांच्यासह अनेक कोतवाल संघटनांच्या पदाधिका-यांच्या स्वाक्ष-या आहेत.